31 जुलैपर्यंत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करता येणार! Senior Selection Category Training

शालेयवृत्त सेवा
0



शिक्षक भारतीच्या मागणीला यश !


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

31 जुलैपर्यंत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करता येणार असल्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदचे संचालक यांनी आज जाहीर केले. यानुसार 52,551/- प्रशिक्षणार्थी यांनी आतापर्यंत प्रशिक्षण पूर्ण केले असून उर्वरित सर्वांनी 31 जुलैपर्यंत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण स्पष्ट सूचना करण्यात आलेल्या आहेत. 23 व 24 जुलै रोजी ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली बंद राहणार आहे तसेच तांत्रिक अडचणींमुळे ज्यांनी उशिरा प्रशिक्षण सुरू केले आहे त्यांना प्रशिक्षण सुरु झाल्यापासून 45 दिवसांपर्यंत  मुदतवाढ दिली आहे, असंही परिपत्रकात नमूद केले आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.  


वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे स्वाध्याय जमा करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मिळावी व प्रशिक्षणार्थींना दिलासा द्यावा याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदचे संचालक यांना पत्र पाठवण्यात आले होते. 


वरीष्ठश्रेणी आणि निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात प्रशिक्षणार्थींना दिलेल्या मोड्युल (प्रकरणे) ची संख्या जास्त आहे. व्हिडिओंची संख्या व व्हिडिओ पाहण्यासाठी लागणारा वेळ खूप जास्त आहे. पिडिएफचे वाचन, व्हिडिओचे निरीक्षण करून स्वाध्याय हस्ताक्षरात लिहिणे व लिहिलेल्या स्वाध्यायांचे पिडिएफ अपलोड करणे यासाठी 15 जुलै 2022 पर्यंतचा दिलेला कालावधी खूप कमी पडत आहे. शालेय कामकाज करून प्रशिक्षणाचे दररोज चार ते पाच तास कामकाज करणे यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. 


दि. 01 जून 2022 पासून राज्यात इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड APP च्या माध्यमातून वरिष्ठ व निवड श्रेणीचे सेवांतर्गत प्रशिक्षण सुरू आहे. 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यात सेतु अभ्यासक्रम आणि जूलै महिन्यातील स्काँलरशिप परीक्षेची तयारी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे स्वाध्याय जमा करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. 


हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. विजय अवसरमोल सरांच्या मते सदर प्रशिक्षण हे उत्तम असल्याने भविष्यात शिक्षकवर्गाला अध्ययन - अध्यापन प्रक्रियेत या प्रशिक्षणाचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)