तोरणमाळ येथे विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी व्यसनमुक्तीची शपथ

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा)

 आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळेस म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना अमली पदार्थ्यांच्या सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. 


पोलीस निरीक्षक पवार यांनी अमली पदार्थ संदर्भात सामाजात जागरुकता निर्माण व्हावी याकरिता व्यसनमुक्ती बाबत तसेच अमली पदार्थ सेवन केल्यानंतर त्याचे काय होतात. जीवनात दुष्परिणाम व्यसनापासून लांब कसे राहावे. आपल्या याबाबत कुटुंबातील लोकांना माहिती देण्याचे आवाहन करीत विद्यार्थ्यासह शिक्षकांना शपथ देण्यात आली. यावेळी आठवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी काही दिवसांपूर्वी विद्यार्थी प्रवीण पावरा याने त्यांच्या वडिलांना तंबाखूचे व्यसन करू नये असे सांगितल्याने त्यांच्या वडिलांनी तंबाखूचे व्यसन सोडले. तसेच महेश भरत परदेशी यांनीही त्यांच्या वडिलांना दारूचे व्यसन सोडायला लावले म्हणून दोन्ही विद्यार्थ्यांचा पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी सत्कार केला. 


कार्यक्रमाच्या ठिकाणी प्राचार्य सुधीर पाटील , उपशिक्षक रवींद्र शिंदे, गणेश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षक महेश पाटील तर आभार सुरेश पावरा यांनी मानले. कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हसावद पोलीस ठाण्याचे शशिकांत पाटील, फुलसिंग पटले, छोटूलाल पावरा, कलिम रावताळे, चंदू साबळे, घनश्याम सूर्यवंशी, उमेश पावरा उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)