आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत अखेर NOC धारक शिक्षकांना मिळाला न्याय...!Inter-district transfer

शालेयवृत्त सेवा
0

 





‘प्रहार’ च्या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल . !

 


आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२२- २३ मधील सिंगल व दुहेरी NOC बाबत शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम अखेर दूर झाला असून प्रहार शिक्षक संघटनेच्या प्रयत्नाने अखेर सिंगल एनओसी धारक शिक्षकांना न्याय मिळाला आहे.याविषयी संघटनेच्या वतीने मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांचेकडे धाव घेत न्यायपूर्ण कार्यवाहीची मागणी करण्यात आई होती.या विषयाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ग्रामविकास विभागाचे  अतिरिक्त मुख्य सचिव मा.राजेश कुमार साहेब यांना तात्काळ कार्यावाहीचे आदेश देण्यात आले. 


आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत अखेर कार्यरत जिल्हा परिषद मधील सिंगल एनओसी धारक शिक्षकांना एनओसी धारक शिक्षक समजून त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.अश्या शिक्षकांना आता पोर्टल वर अर्ज करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे.अश्या शिक्षकांना आता आपल्या सिंगल एनओसी चा आदेश क्रमांक ,  दिनांक व ना हरकत प्रमानपत्राचा जिल्हा म्हणजेच आपल्या कार्यरत जिल्हा परिषदेने ज्या जिल्ह्यात जाण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे तो जिल्हा ( बदलीने जाणारा जिल्हा ) या  बाबींची माहिती पोर्टल वर भरावी लागणारा आहे.प्रहार शिक्षक संघटनांच्या वतीने याबाबत मंत्रालय स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून शिक्षकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रम दूर झाला आहे.तेंव्हा आता सिंगल एनओसी धारक प्रतीक्षेतील अडीच ते तीन हजार शिक्षकांना न्याय मिळाला आहे.

 

NOC बाबत शासन निर्णयात नमूद तरतुदी प्रमाणेच कार्यवाही होणार असून कुठलाही नवीन बदल एनओसी बदली संवर्ग मध्ये आता होणार नाही.NOC ही ज्या जिल्ह्यात शिक्षक कार्यरत असतो त्या जिल्ह्याची मात्र ज्या जिल्ह्यात जावयाचे आहे त्या जिल्ह्यामधील संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या रिक्त पदावर अथवा भविष्यात रिक्त होणाऱ्या त्या बिंदूवर सामावून घेण्याबाबत दिलेली असते.ज्या जिल्ह्यात जायचे आहे त्या जिल्ह्यांची NOC आता गरजेची नाही.दोन NOC म्हणजे २०१७ पूर्वी बदलीचे ऑनलाईन धोरण अस्तित्वात येण्याआधी आपसी बदलीची प्रकरणे ,अशी प्रकरणे ऑनलाईन धोरणापूर्वीच ऑफलाईन पद्धतीने मार्गी लागली आहेत.तेंव्हा शिक्षकांनी गोंधळून न जाता NOC संवर्गातून अर्ज करतांना सिंगल NOC प्राप्त शिक्षक अर्ज करू शकतात.किंबहुना तेच NOC धारक आहेत.मात्र अर्ज करतांना काही शिक्षकांकडे एक पेक्षा जास्त जिल्हा परिषदच्या NOC असल्यास तो शिक्षक एकाच जिल्ह्याकरिता व एकाच NOC चा लाभ घेऊ शकतो.

 

NOC धारक शिक्षक - NOC धारक शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांकडे ज्या जिल्ह्यात जायचे आहे त्या जिह्याची NOC मात्र ती कार्यरत जिल्हा परिषदेने दिलेलीच असेल.

 

NOC धारक शिक्षकांमध्ये प्राधान्यक्रम - NOC धारक शिक्षकांमध्ये बदली प्राधान्यक्रम ठरवितांना यात आता अंशतः बदल करण्यात आला आहे.तो पुढील प्रमाणे असेल,

 

१) NOC दिनांक ऐवजी सेवा जेष्ठता. २)सेवाजेष्ठता सारखी असल्यास जन्म दिनांक 

३) जन्म दिनांक सारखे असल्यास आडनाव.४)एनओसी दिनांक

 

NOC संवर्गाला बदली प्रक्रियेत सर्व प्रथम प्राधान्य असून त्या नंतर संवर्ग १ , संवर्ग २ व नंतर सर्वसाधारण संवर्ग या प्रमाणे प्राधान्यक्रम असेल.ज्या शिक्षकांकडे NOC आहेत आणि ते संवर्ग १ अथवा २ मध्ये येतात त्यांनी कुठल्याही एक सवर्गामधूनच अर्ज करायचा आहे.तो निर्णय संबंधित शिक्षकाचा असेल.

 

NOC मधून अर्ज केलेल्या शिक्षकाचा ज्या जिल्ह्याची NOC असेल त्या जिल्ह्यासाठीच NOC मधून विचार होईल.इतर जिल्ह्यांसाठी त्याचा सर्वसाधारण मधून विचार केला जाईल.याची नोंद घ्यावी.

 

पेसा बाबत महत्वाचे- जे जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्र आहे.अश्या जिल्ह्यांमध्ये आपण पेसा मधील आहेत का ? अश्या प्रश्नासाठी जे शिक्षक अनुसूचित जमातीचे ( ST) प्रवर्ग मधून निवड झालेले असतील मात्र स्थनिक पेसा क्षेत्रातील रहिवासी असतील म्हणजेच त्यांच्याकडे तसा सक्षम पुरावा असेल अश्या शिक्षकांनाच पेसा मधील रहिवासी आहे का ? त्याला हो करायचे आहे. इतरांकरिता तो पर्याय नाही.

 

एका शिक्षकाला एकाच कॅडर चा लाभ घेता येणार आहे.आंतरजिल्हा बदली प्रक्रियेची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून रोस्टर संबंधी ३४ जिल्हा परिषदेची माहिती देखील पूर्ण झाली आहे.फेज -२ ची म्हणजेच आंतरजिल्हा बदलीची सुरवात झाली असून २ ऑगस्ट अथवा त्या नंतर कुठल्याही क्षणी आंतरजिल्हा बदली करीता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणारा आहे.आंतरजिल्हा बदली करिता पोर्टल सुरू झाले असले तरी प्रथम सर्व ३४ जिल्ह्यांचे रोस्टर पोर्टल वर प्रसिद्ध होणार आहे. नंतर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होईल.याबाबतची सूचना ग्रामविकास स्तरावरून उद्या १ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)