सेवानिवृत्त मुख्याध्यापक सीताराम परशुराम पाटील यांनी पत्नीच्या स्मरणार्थ दिला जि.प.शाळेस ७५ हजाराचे पाणी फिल्टर व कुलिंग यंत्र भेट !

शालेयवृत्त सेवा
0

 


उमर्दे खुर्द शाळेस वाॅटर फिल्टर भेट.. जिल्हाधिकारी मनिषा खत्री, पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार !


नंदुरबार  (जिल्हा प्रतिनिधी गोपाल गावीत) :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमर्दे खुर्द येथील शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाणी करिता ७५ हजाराचे पाणी फिल्टर व पाणी कुलिंग यंत्र सेवानिवृत्त मुख्याध्यापक सीताराम परशुराम पाटील यांनी त्यांच्या पत्नी कै . शकुंतला सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेस भेट दिली . 


या प्रसंगी स्वतः सीताराम पाटील , गावाचे सरपंच अरविंद ठाकरे उपसरपंच सागर साळुंखे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र मराठे , केंद्र प्रमुख वसंत पाटील , मुख्याध्यापक राजेंद्र बागुल , उपशिक्षिका मीना पाटील , उपशिक्षिक निलेश चव्हाण , ग्रामसेवक भरत घुले , ग्रामपंचायत सदस्य कैलास वळवी , पोलीस पाटील , दिलीप चौधरी तसेच प्रतिष्ठित नागरिक कृष्णाजी गंगाराम बोराणे हे उपस्थित होते . 


सीताराम पाटील यांचे जिल्हा परिषद शाळा उमर्द खुर्द व शाळा व्यवस्थापन समिती उमर्द खुर्देतर्फे आभार मानन्यात आले . दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री , जिल्हा पोलिस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी एक लाखाचे पाणी फिल्टर व कुलिंग यंत्र दिल्याबद्दल सीताराम पाटील व शाळेच्या परिसरात असलेल्या रोपांना ठिबक सिंचन दिल्याबद्दल देविदास साळवे यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)