नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
परिषद जिल्हा परिषद हायस्कूल लिंबगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी संपन्न झाली. निळा केंद्राची दुसरी शिक्षण परिषद संपन्न झाली.
प्रथम सत्र : परिषदेच्या अध्यक्षस्थानी निळा केंद्राचे कृतिशील केंद्रप्रमुख श्री धोपटे व्ही.एस.तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मुख्याध्यापक श्री चोंडे एन.एम.,हायस्कूल च्या मुख्याध्यपिका शेळके मॅडम,उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री.श्रीकांत कुलकर्णी सर, श्री गोवंदे सर,श्री वाघमारे सर, श्रीमती वाटेगावकर मॅडम यांच्या उपस्थितीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून झाली.
प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री धोपटे सर यांनी केले.तर आपल्या प्रदीर्घ सेवेत आलेल्या अनुभवाची शिदोरी लिंबगाव चे माजी मुख्याध्यापक श्री सावळे सर यांनी कुणालाही कंटाळवणे वाटणार नाही पण प्रत्येक शब्द आणि उपक्रम एक शिक्षक या नात्याने सर्वांना उपयुक्त ठरेलं असे मार्गदर्शन केले.
आजच्या शिक्षण परिषदेचे वैशिष्ट्ये म्हणजेपाटील मॅडम मरळक बु. डोईजड मॅडम मरळक बु. भाग्यश्री धोत्रे मॅडम मरळक खु.यांनी आपले संपूर्ण कौशल्य आणि अनुभव पणास लावून घेतलेले आदर्श पाठ घेतला.
पाटील मॅडम : परिपूर्ण स्टेज करेज,विपुल प्रमाणात वापरण्यात आलेले शैक्षणिक साहित्य,पाठात आवश्यक त्या ठिकाणी अध्ययनार्थिंचा कृतिशील सहभाग,प्रभावी प्रस्तावना,पाठाचा आत्मा विषय प्रतिपादन,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या सर्वांचा कुशलतेने वापर करून अन्नसाखळी हा घटक प्रभाविरित्या शिकवला.
त्यात आलेली प्रत्येक संकल्पना व्यवस्थितरीत्या स्पष्ट केली. पाठाच्या शेवटी आपण काय शिकलो...हिंस्त्र प्राण्यांची नावे लिहा.सापांची संख्या कमी झाली तर? असे वैचारिक प्रश्न देऊन गृहपाठ दिला..
डोईजड मॅडम : विदयार्थी असो किंवा शिक्षक असो तो आनंदात आणि दुःखात घडलेल्या घटना /अनुभव कधीच विसरत नाहीत.हा अनुभव समोर ठेऊन डोईजड मॅडम यांनी.....पाहिलेतील मुलांचे स्वागत हा पाठ घेण्यापूर्वी. "वरदान लाभलेल्या सुंदर आवाजाचा वापर करून" विध्यार्थ्याना आनंद निर्माण होईन अशी एक प्रार्थना घेतली.आणि वातावरणात उत्साह निर्माण केला. पहिलीच्या मुलाला कोणत्या पद्धतीने स्वागत हवे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेतले.
भरपूर शैक्षणिक साहित्याचा वापर करून,विध्यार्थ्याना चॉकलेट चे अमिश देऊन आणि प्रबलन कौश्यल्याचा वापर करून एक आदर्श पाठ घेतला.सर्व विध्यार्थ्यांकडून फुगा फुगावणे,फुग्याचे चित्र चार्टवर चिटकून घेतले,हातावर कोण जास्त वेळ फुगा ठवतो ही कृतीकरून घेतली.
धोत्रे मॅडम : विद्याप्रवेश बदद्ल त्यांनी स्वतः च्या शाळेतील विध्यर्थ्यासोबत केलेल्या कृतीचा,भाषिक खेळाचा व्हिडीओ दाखवला.एक आदर्श सुलभक म्हणूनमॅडम चे आदर्श पाठ होत आहेत.मॅडम ला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा. श्रीमती वाघमारे मॅडम नीं त्याना जो विषय दिला होता.त्याला शेवटच्या तासिकेत ही परिपूर्ण न्याय दिला.
निपुण भारत,त्याचा लोगो, त्याचा उद्देश,आणि त्या दृष्टीने घ्यायव्याच्या कृती,आणि त्या बाबतीत मार्गदर्शन केले. या परिषदेसाठी तांत्रिक मदत आणि प्रोजेक्टर ऑपरेट चे उत्कृष्ट कार्य नितीन दुगाणे सर आणि संजय राठोड सर या तंत्रस्नेहीनीं पुरवले.
आजच्या परिषदेचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे पूर्वी गटसंमेल मधून पाठावर साधक बाधक चर्चा होत होती मध्यंतरी ही पद्धत बंद पडली होती ती चर्चा घडवून आणली.... त्यात आदर्श पाठावर राजेश रामगिरवार, केंद्रप्रमुख श्री धोपटे सर, किशोर नरवाडे, श्रीमती पांडे मॅडम, कैलास पोहरे, गंगाधर सावळे यांनी प्रतिक्रिया दिल्या.
तर श्रीमती पाटील मॅडम यांनी प्रतिक्रियेतून आलेल्या अभिनंदनाचा आणि सूचनांचा स्विकार केला.सर्वांचे आभार मानले.एकंदरीत आजची शिक्षण परिषद एक आदर्श आणि कृतिशील झाली याचे सर्वस्वी श्रेय श्री धोपटे सर केंद्रप्रमुख निळा यांना जाते.सर्वांनी पूर्णवेळ या परिषदेचा आनंद लुटला.
या परिषदेस नांदेड जिल्हा परिषदेचे अल्पसंख्यांक विभागाचे यशस्वी काम पाहणारे श्री रुस्तुम शेख सर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर श्री राम किरवले सर यांनी भेट दिली.त्यात शेख सरांनी अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बदद्ल मार्गदर्शन केले तर सरल पोर्टल वर विध्यार्थ्यांची माहिती जिल्हा परिषदेमार्फत मोफत भरण्यात येणार असल्याची माहिती दिली. या परिषदेचे सूत्रसंचालन श्री मिरदोडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री किशोर नरवाडे यानी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .