महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटना माहूरगडच्या तालुकाध्यक्ष म्हणून एस.एस.पाटील तर तालुका प्रमुख म्हणुन सुनिल कांबळे

शालेयवृत्त सेवा
0

  



महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटना माहूरगडची नूतन कार्यकारिणी गठीत !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :              

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष मा.मधुकर उन्हाळे यांच्या अध्यक्षेतेखाली श्री क्षेत्र माहूरगड  येथे नूतन कार्यकारणी व प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यावेळी राज्य कार्यकारी अध्यक्ष  मा. मधुकरराव उन्हाळे ,कार्यक्रमाचे मुख्य अतिथी संजयजी कोठाळे विभागीय अध्यक्ष ,संघटन मंत्री विठ्ठलराव आचणे ,जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस दिगंबर पाटील कुरे ,जिल्हा कार्याध्यक्ष नरसिंग एड्रलवार ,जिल्हा प्रवक्ते राजेंद्र पाटील माळेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ मिसे ,रेणुका देवी पतसंस्था किनवट माहूरचे माजी अध्यक्ष चेअरमन संतोष दासरवाड ,रवी नेमानेवार जिल्हा उपाध्यक्ष , रेणुका देवी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन दहिफळे सुधाकर शिक्षक नेते सुनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर  कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली.


              या बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अध्यापक बाबुराव माडगे यांना नियुक्त करण्यात आले. तालुका नेता म्हणून सुनिल कांबळे तर तालुकाध्यक्ष म्हणून एस.एस.पाटील यांना नियुक्त करण्यात आले.माहूर मधील श्री.एस.एस.पाटील यांचे समर्थन करणारा शिक्षक वर्ग यावेळी म.रा.शिक्षक परिषदेत सहभागी होत विविध पदांवर नियुक्त झाला.त्यापैकी अभ्यासू अध्यापक श्याम राठोड यांना संघटनमंत्री म्हणून नियुक्ती देण्यात आली.


तालुका सरचिटणीस म्हणून विजय घाटे हे नियुक्त झाले. तालुका कार्याध्यक्ष म्हणून सुधीर जाधव, तालुका कोषाध्यक्ष जितेंद्र वर्मा, तालुका उपाध्यक्ष भरत विराळे,प्रविण वाघमारे,रणजित वर्मा व मोमिन सर हे नियुक्त केले गेले.तालुका संपर्क प्रमुख दिपक गाढवे, तालुका प्रवक्त मनोज बारसागडे तर तालुका सरसचिव मुन्ना थोरात, तालुका संघटक शैलेश गिऱ्हे  राजीव मार्गमवार,नामावार सर,पांचाळ सर, हेलगंड सर हे नियुक्त झाले.तसेच सहसंघटक म्हणून इंदोरभगत, सुधाकर चेवटे, व्यंकट फड,शिवाजी ढोक, बालाजी गुरव,कार्यालीन सचिव ज्ञानेश्वर माणिककामे आणि तालुका प्रसिद्धी प्रमुख मिलींद कंधारे यांची नियुक्ती करण्यात आली.महिला प्रतिनिधी सौ.शितल गौरखेडे, सौ.असलेशा जाधव,सौ.शिल्पा कांबळे , सौ.ज्योती वाठोरे,सौ.जयश्री सुर्यवंशी यांना कार्यकारी अध्यक्ष मधुकररावजी उन्हाळे सर यांनी नियुक्तीपत्र देऊन संघटनेत प्रवेश देण्यात आला.


                    कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना एस.एस.पाटील यांनी माहूर मधील तळागाळातील काम करणाऱ्या शिक्षक बंधू भगीनी आणि विद्यार्थी यांच्या न्याय व हक्कासाठी आम्ही कटीबद्ध राहत काम करण्याचा संकल्प केला आणि संघटनेत प्रवेश करणारा व आपल्या नैतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र संघर्ष करण्याचे वचन त्यांनी दिले. 


           कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संघनेचे कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी माहूर ही पुण्यभूमी आहे. येथील तांडा-वाडी-वस्तीवर काम करणाऱ्या आणि सर्वस्व वेचणाऱ्या इथल्या शिक्षकांच्या प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी संघटना तत्पर असेल आणि त्यासाठी संघटना नेहमीच केवळ संघटनेचा म्हणून नाही तर शिक्षक आणि माणूस म्हणून सदैव राबेल अशी ग्वाही देतो असे म्हणाले. 


                      कार्यक्रमाचे  चपखल सुत्रसंचलन बाबुराव माडगे यांनी केले,तर आभार सुनिल कांबळे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय घाटे,मिलींद कंधारे ,मनोज बारसागडे ,रणजित वर्मा ,प्रविण वाघमारे ,सुधीर जाधव ,भाग्यवान भवरे ,हेलगंड सर आदींनी मेहनत घेतली .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)