शिक्षकनेते अनिल बोरनारे, प्रदेश सहसंयोजक, भाजपा शिक्षक आघाडी यांच्या निवेदनाची घेतली दखल !
मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :
प्रशिक्षणप्राप्त शिक्षकांचे वरीष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तात्काळ निकाली काढण्याबाबत उपसंचालनालकाने काढले पत्र काढले आहे.
महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय, मुंबई जवाहर बालभवन, तळमजला नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई ४०० ००४ /८६ दिनांक 2 8 जुलै 2022 जा.क्र. शिउसं माध्य/ २०२२/7514 संदर्भाने पत्र काढले आहे.
शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, उत्तर, दक्षिण पश्चिम विभाग , शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, ठाणे, रायगड, पालघर, लेखाधिकारी (शिक्षण) बृहन्मुंबई, उत्तर, दक्षिण पश्चिम विभाग , ठाणे, रायगड, पालघर यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी पत्र दिले आहे.
प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त शिक्षकांना वरीष्ठ व निवडश्रेणी तात्काळ लागू करण्याबाबत श्री. अनिल बोरनारे, प्रदेश सहसंयोजक, भाजपा शिक्षक आघाडी यांनी २७ जुलै २०२२ रोजीचे निवेदन दिले होते.
उपरोक्त विषयांकित संदर्भिय निवेदनाद्वारे श्री अनिल बोरनारे, प्रदेश सहसंयोजक, भाजप शिक्षक आघाडी यांनी प्रशिक्षणप्राप्त शिक्षकांचे वरीष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तात्काळ निकाली काढण्याबाबत या कार्यालयाकडे विनंती केलेली होती.
तरी आपल्या अधिनस्त शाळांतील प्रशिक्षणप्राप्त शिक्षकांचे वरीष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तात्काळ निकाली काढण्याबाबत नियमानुसार उचित कार्यवाही करावी. असे पत्र संदीप संगवे विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी संबधीत विभागाला दिले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .