शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै ऐवजी 31 जुलै ला होणार

शालेयवृत्त सेवा
0

 


20 जुलै 2022 ऐवजी रविवार 31 जुलै 2022 रोजी होणार


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी ) ही दिनांक 20 जुलै 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याबाबत संदर्भ क्रमांक दोनच्या प्रसिद्धी पत्रकाने जाहीर करण्यात आले होते.

 

तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेले सदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा 20 जुलै 2022 ऐवजी रविवार 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेश पत्र 31 जुलै 2022 च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. असे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)