मुंबई,ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

शालेयवृत्त सेवा
0

 






सर्विस बुक दुय्यम प्रत व दरमहा सॅलरी स्लिप देण्याबाबत दिले आदेश !


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

सर्विस बुक हे शिक्षकांचा महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. प्रत्येक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांजवळ सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत असणे आवश्यक आहे असा आग्रह शिक्षक आमदार स्व. मोते सर  नेहमी धरायचे अनेक संस्था व शाळांकडून सर्विस बुक ची दुय्यम प्रत देण्याबाबत टाळाटाळ केली जात होती. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्यावर  मा. शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन सर्विस बुक व सॅलरी स्लिप मिळत नसल्याची तक्रार केली व निवेदन दिले. 


अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. याबाबत  शिक्षण उपसंचालक संदिप संगवे यांनी याबाबत कार्यवाही करीत मुंबईसह ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व ज्यु. कॉलेज यांना याबाबत आदेश दिले आहेत. आदेशाची कॉपी सोबत देत आहे त्याचे अवलोकन करावे. अशी माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)