बर्थडे शिक्षकाचा! जल्लोष विद्यार्थी उपयोगी उपक्रमाचा ! १०० पुस्तिकेचे वाटप करून केला वाढदिवस साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षक संतोष सवडे यांचा अभिनव उपक्रम !


जालना ( शालेय वृत्तसेवा ) :

आजच्या काळात सगळीकडे आपले वाढदिवसाचे बॅनर लावून डीजेच्या तालावर बर्थडे पार्टी साजरी करणे चॉकलेट ,खाऊ ,केक चहा पान ,नाष्टा बर्थडे पार्टी आयोजित करून वाढदिवस साजरा करण्याची क्रेज निर्माण झालेली आहे.


परंतु या सर्व गोष्टीला फाटा देऊनश्री सरस्वती भुवन प्रशाला कुंभार पिंपळगाव येथे कार्यरत असलेले मराठी विषय शिक्षक संतोष सवडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल अशा अचूक लेखनासाठी मराठी शुद्धलेखन या पुस्तिकेचे मोफत वाटप करून पोटाची नव्हे तर मनाची आणि ज्ञानाची भूक भागविणारी, दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी एक आगळीवेगळी भेट दिली आहे.


संतोष सवडे यांच्या या सृजनशिल उपक्रमाचे परिसरातील सर्व विद्यार्थी, शिक्षक प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे , उपमुख्याध्यापक सुभाष देठे यांच्यासह जागृत पालक यांच्याकडून अभिनंदन होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)