शिक्षक रंजितसिंह डिसले यांची अब्दुल कलाम 'प्राइड ऑफ इंडिया' पुरस्कारासाठी निवड | Ranjitsinh Disale selected for Abdul Kalam 'Pride of India' award

शालेयवृत्त सेवा
0

 


 

 27 जुलै रोजी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे हा पुरस्कार प्रदान ।

 

अब्दुल कलाम 'प्राइड ऑफ इंडिया' पुरस्कारासाठी शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड. !  

 

रणजितसिंह डिसले यांनी मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी तसेच शिक्षणात क्विक-रिस्पॉन्स (QR) कोड पाठ्यपुस्तक क्रांती घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी जागतिक शिक्षक पुरस्कार 2020 जिंकला होता.

 

 2022 च्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली आहे. डिसले यांनी ट्विटरवर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे एक पत्र शेअर करून या पुरस्काराची माहिती दिली.


निमंत्रणानुसार,  डिसले यांना 27 जुलै रोजी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी डिसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक पदाचा नुकताच राजीनामा दिला होता.


 

डिसले यांनी ट्विट करून सांगितले क की, दिवंगत कलाम यांच्या कुटुंबाकडून हा पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होत आहे.या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी निश्चितच वाढली आहे, असेही ते पुढे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)