शालेय पोषण आहाराचे लेखापरीक्षण व अभिलेख्यांच्या छायांकित प्रति उपलब्ध करून ऑनलाईन माहिती भरणेबाबतचा आदेश मागे घेण्याची मागणी

शालेयवृत्त सेवा
0

 



महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने दिले निवेदन ।


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री , महाराष्ट्र शासन, मुंबई,शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र शासन,मुंबई,प्रधान सचिव शालेय शिक्षण, महाराष्ट्र शासन, मुंबई,शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शासन, पुणे,शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र शासन पुणे, यांना शालेय पोषण आहार योजनेचे लेखापरीक्षण पं.स.स्तरावर  कार्यालयीन पत्र दि.१३जुलै २०२२ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.  


राज्यातील सर्व शाळांचे सन२०१५-१६ते सन २०१९-२० या पाच वर्षांच्या कालावधीतील शालेय पोषण आहार योजनेच्या अभिलेख्याचे लेखापरीक्षण शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी या संस्थेच्या मार्फत करण्याबाबत कळविण्यात आले आहे.त्यासाठी शाळांकडून विहीत नमुन्यातील माहिती मागविण्यात आली आहे.तसेच सदर माहिती सोबत सर्व अभिलेख्यांच्या छायांकित प्रतिही मागविण्याबाबत निर्देश दिले आहेत.


वास्तविक दरवर्षी शालेय पोषण आहार योजनेचे स्थानिक निधी लेखापरीक्षण समिती कडुन लेखापरीक्षण शासनामार्फत केले जाते.त्यासंबंधी उपयोगिता प्रमाणपत्र शाळांकडून घेण्यात येते.तसेच वेळोवेळी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पर्यवेक्षण यंत्रणेमार्फत वेळोवेळी अभिलेख्यांची वअंमलबजावणी बाबत तपासणी केली जाते.कोरोना परिस्थितीनंतर नुकत्याच शाळा सुरू झाल्या असताना विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे.त्यासाठी  शिक्षकांचा अधिकाधिक वेळ हा अध्यापन कार्यासाठी खर्च होणे अपेक्षित आहे.


शालेय  पोषण आहार योजनेंतर्गत लेखापरीक्षणासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करणे व पाच वर्षांचे सर्व अभिलेखे लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करणे हे अतिशय क्लिष्ट  व वेळखाऊ काम आहे.सर्व शाळांनी जमाखर्च अहवाल (मासिक व वार्षिक) वेळोवेळी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे सादर केलेला आहे. सर्व बाबींचा विचार करता सदरील लेखापरीक्षणाबाबत व अभिलेख्यांच्या  छायांकित प्रति उपलब्ध करून ऑनलाईन माहिती भरणेबाबतचा आदेश मागे घेऊन सदरचे कामकाज राज्यातील सर्व पंचायत समितीच्या स्तरावरून पूर्ण करण्याचे निर्देश व्हावेत.

 

या  मागणीचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर च्या वतीने शासनस्तरावर नुकतेच इमेल द्वारे पाठवण्यात आले आहे. निवेदनावर प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस यांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)