परीवर्धा जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

शालेयवृत्त सेवा
0

 


 

नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा) :

शहादा परीवर्धा येथील जि.प.केंद्रशाळेत बँक ऑफ बडोदा शाखेतर्फे बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त परीवर्धा शाखेच्या वतीने शैक्षणिक साहीत्य व मिठाईचे वाटप करुन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल, चित्रकला वही, खोडरबर, खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. शाखाधिकारी पुष्पराज कोल्हे यांच्या शुभ हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


त्यावेळी शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. बॅंकेचा कामकाज, व्यवहार कसा असतो. प्रत्यक्ष शिक्षक,विद्यार्थ्यांना बॅकेत भेट देण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते . सोबतच पंकज ढोले , बॅंकचे कर्मचारी व ग्रामस्थ भरत चौधरी, गोविंद पाटील, नीलेश पाटील सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत जोशी सर यांनी केले. तर आभार काळूराम टोपे सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)