नीट परीक्षा" रविवार 17 जुलै रोजी.. परिसरात 144 कलम

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड  ( शालेय वृत्तसेवा ) :

"नीट परीक्षा 2022" ही रविवार 17 जुलै 2022 रोजी सकाळी 9 ते 5 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 42 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. 


परीक्षा केंद्राच्या परिसरात 17 जुलै  रोजी  9  वाजेपासून ते सांयकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतच्या सर्व झेरॉक्स मशीन  भ्रमणध्वनी व पेजर चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)