नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न ,नंदुरबार डायट वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांचा सहभाग | National Workshop

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार (प्रतिनिधी गोपाल गावीत) :

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत नवी दिल्ली मधील हॉटेल अशोका येथे National Workshop on Achieving Learning Outcomes या विषयावर नियोजित दि.२७ व २८ दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन मा.श्रीमती अन्नपूर्णा देवी शिक्षण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा.श्रीमती अनिता करवाल, सचिव ,शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 


पहिल्या दिवसाच्या कार्यशाळेतील ठळक मुद्दे १) सुरुवातीस तेलंगणा राज्याचे बी आर सी समन्वयक व गुजरात राज्याच्या सीआरसी समन्वयक यांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण व शैक्षणिक कार्याविषयी सादरीकरण केले. विशेष म्हणजे या सादरीकरणात डायटचे महत्व अधोरेखित केले.२) मा.अनिता करवाल ,सचिव , शालेय शिक्षण ,भारत सरकार यांनी डायट व एस सी ईआर टी यांच्या कार्याच्या योगदानाबद्दल सादरीकरणाच्या आधारे व अनुभवाआधारे कौतुक केले.तसेच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाप्रमाणेच सर्व राज्यांनी राज्य संपादणूक सर्वेक्षण(SLAS) येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये आयोजित करण्याविषयीचे सुतोवाच केले. ३) NAS 2021ॲपचे उद्घाटन मा. राज्यमंत्री शालेय शिक्षण यांच्या हस्ते करण्यात आले. ४) मा. अन्नपूर्णा देवी राज्यमंत्री भारत सरकार यांनी विश्लेषणा आधारे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले तसेच शिक्षणाची गती वाढावी यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म व लॉंग टर्म अशी नीती सर्व राज्यांनी तयार करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ५) प्रा.इंद्राणी भादुरी एन सी ई आर टी दिल्ली यांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ अहवालावर राज्यनिहाय ,जिल्हा निहाय विश्लेषण कसे करावे याबाबत सादरीकरण करून विविध राज्यांच्या प्रतिनिधी मधून चर्चेद्वारे स्पष्ट केले.


तसेच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण नंतरच्या पुढील काळात राज्यांनी व जिल्ह्यांनी करावयाचे नियोजन(Roadmap) तयार करण्यावर चर्चा घडवून आणली. ६) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ च्या निष्कर्षांवर आधारित कर्नाटक, मध्य प्रदेश ,लडाख, मणिपूर ,राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांच्या प्रतिनिधींनी सादरीकरणाद्वारे आपल्या राज्याची स्थिती मांडली. यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ७) N-DEAR (National Digital Education Architecture) ,विद्या समीक्षा केंद्र (VSK) याबाबत श्री रजनीश कुमार संचालक व प्रोफेसर अमरेंद्र बेहरा सहसंचालक एनसीईआरटी यांनी माहिती दिली. ८) श्री.व्यंकटेश रमणा आर .हेगडे यांनी आऊट ऑफ स्कूल चिल्ड्रन (OoSC) याबाबत सादरीकरण केले. सद्यस्थितीत भारतात चार कोटी मुले शाळाबाह्य असल्याचे सांगितले.दुसरा दिवस स्थळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र,१५ जनपद ,नवी दिल्ली कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय शिक्षा नीती २०२०- परिवर्तनकारी सुधार के दो वर्ष पुरे होने के उपलक्ष ने नई पहले का उद्घाटन या विषयावर आयोजित केली होती.


 कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.अमित शहा गृह व सहकार मंत्री भारत सरकार प्रमुख अतिथी मा.श्री धर्मेंद्र प्रधान शिक्षण व कौशल्य विकास मंत्री ,भारत सरकार मा.डॉ.राजीव चंद्रशेखर राज्यमंत्री' कौशल्य विकास मा.श्रीमती अन्नपूर्णा देवी शिक्षण राज्यमंत्री ,भारत सरकार मा.डॉ.सुभाष सरकार शिक्षण राज्यमंत्री, भारत सरकार मा.डॉ. रंजन कुमार रंजन सिंह शिक्षण व विदेश राज्यमंत्री भारत सरकार कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीस नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत/ वंदना सुमधुर आवाजात गायन केले. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वर आधारित नुक्कड नाटक सादर केले तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित अतिशय सुंदर असे गाणे सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. अनिता करवाल सचिव,शिक्षण मंत्रालय ,भारत सरकार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याविषयी माहिती सांगितली व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण द्विवर्षपूर्ती निमित्ताने पुढील कार्य दिशा प्रास्ताविकातून स्पष्ट केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० च्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने पुढील काळात भारत सरकार मार्फत विविध कार्यक्रम नियोजित असल्याबाबत एका फिल्म मधून सादर करण्यात आले. सदर नवीन कार्यक्रमांचे उद्घाटन मा. गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले.


1. mobile App of public consistency for NCF

2.200 Maths Virtual Lab

3.N-DEAR & VIDYA SAMIKSHA KENDRA

4.VIDYA AMRUT PORTAL

5.NISHTHA 4.01 For ECCE

6.School Innovation Policy 

7. New Age Skills

8. Skill Hub Initiative

9.Linking Vocational Education with Higher Education 

10. E- launch of IKS

 MELA@AICTE 


मा.धर्मेंद्र प्रधान यांचे मनोगत- 1835 च्या मेकाले शिक्षण पद्धतीचे शिक्षण हे पराभूत व अपमानात्मक शिक्षण विचार निर्माण करणारे होते. आता दोनशे वर्षानंतर या विचारातून बाहेर निघून स्वावलंबी व आत्मभिमानी शिक्षणाकडे नवीन शैक्षणिक धोरण घेऊन जात असल्याचे सांगितले. शिक्षण आमची संपत्ती असून भारताला विश्वगुरू बनविण्याची ताकद शिक्षणात असल्याचे प्रतिपादन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नंतर आलेल्या कोरोना संकटाच्या काळातून आपण बाहेर निघालो असून आता शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. 


मा.अमित शहा यांचे मनोगत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०२हे प्रतिभावान नागरिक बनविण्यासाठी असून स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसार आपल्याला संघर्ष करता येणारे, चारित्र्यवान ,परोपकार भाव असणारे व सिंहासारखे साहस असणारे नागरिक शिक्षणातून तयार करावयाचे आहेतअसे प्रतिपादन केले.२१ व्या शतकात ज्ञान व विज्ञानाच्या जोरावर जगाला भारत निश्चितच सर्व क्षेत्रात प्रगतीसाठी पुढे नेण्यास तयार असेल. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषा सोबत त्रीभाषा सूत्राला महत्त्व देऊन मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. 


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हा ग्रंथ नसून एक ग्रंथालय आहे अतिशय व्यवस्थित रित्या वाचन केल्यास यातून अनेक बाबी आपणास समजू शकतात. तरी देशातील सर्व राज्यांनी यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्य सरकार अथवा केंद्र सरकार या ऐवजी टीम इंडिया म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले. नवीन घोषणा MERU (Multidisciplinary Educational Research University) स्थापना करणे.२०३००पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात / दोन जिल्हे मिळून multidisplinaryi संस्था स्थापन केली जाईल.२०२५ पर्यंत ५०टक्के वेबसाईट शिक्षणाचे लक्ष यासह विविध कौशल्य विकास व शिक्षणात्मक योजनांची माहिती सांगून मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व सांगून देशातील वैद्यकीय तंत्रज्ञानात्मक क्षेत्रासह न्यायपालिका क्षेत्रातही स्थानिक भाषेवर जोर दिला जाणार असल्याचे प्रतिपादन केले. 


सदर दोन दिवसीय कार्यशाळेत देशातील सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशाचे प्रत्येकी सहा अधिकारी निमंत्रित होते. सदर कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व सुरज मांढरे आयुक्त शिक्षण ,तसेच कैलास पगारे, राज्य प्रकल्प संचालक, एम पी एस पी यांच्यासह रमेश चौधरी वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांनी महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक स्थितीबाबत विविध मुद्द्यांवर चर्चेद्वारे सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)