आदर्श मराठी व गुजरातीत गुरुपौर्णिमेच्या दिनी गुरूंना वंदन !

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

नंदुरबार येथील स्वा.सै. श्री.गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर व आदर्श गुजराती विद्यामंदिर येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


    याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती कल्पना पाटील,श्री. युवराज पाटील,मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भदाणे तसेच श्री. भद्रेश त्रिवेदी सर उपस्थित होते.यावेळी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


   गुरूंना वंदन म्हणून सेजल रजाळे,मंदार पाटील,रोहिणी चौधरी,मृणाल भदाणे,ऋषिकेश पाटील,भावेश मोरे, यांनी भाषणे दिली,तसेच शिक्षक गटातून गुरुची महती श्री.राहुल सूर्यवंशी व निखिल गोंधळी यांनी स्पष्ट केली.प्रमुख अतिथींनी गुरू म्हणून आई,शिक्षक आणि निसर्ग यांना अभिवादन करून त्याचे महात्म्य समजावून सांगितले.


  कार्यक्रमाप्रसंगी विविध गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.श्री.विठ्ठल मंदिर संस्थान,तळोदा व वेणूगोपाल चिकित्सा केंद्र,नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने "जिल्हा स्तरीय गीता पठण स्पर्धा"(अध्याय क्र.१२ व १५) आयोजित करण्यात आली होती.त्यात शाळेतील लहान गटातून सेजल रजाळे(इ.४थी)-प्रथम क्रमांक,ऋषिकेश महेंद्र पाटील(इ.२री)-द्वितीय क्रमांक,हर्षदा साळुंके(इ.४थी)-तृतीय क्रमांक,तीर्थराज बच्छाव(इ.२री)-उत्तेजनार्थ बक्षीसपात्र ठरून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे गुरुपौर्णिमानिमित्त मान्यवरांच्या हस्ते लेखणी व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अशोक सोनार यांनी आभार श्री.नितेश नाथजोगी यांनी मानले.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)