महाराष्ट्र शासनाच्या "राज्य शिक्षक पुरस्कारासाठी क्यूआर कोड / लिंक व्दारे प्रस्ताव सादर करू शकता..

शालेयवृत्त सेवा
0

 


"क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार "

वरील क्यूआर कोड स्कॅन करून लिंक भरू शकता


शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना  महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविले जाते. हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषांद्वारे प्रदान करण्यात येणार आहेत आपण भरलेल्या माहितीचे मूल्यांकन करून गुणानुक्रमे शिक्षकांना प्रत्यक्ष मुलाखतीस बोलावले जाते.


  ◼️प्रस्तावासाठी आवश्यक अटी: 

1)    शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.

2)    मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.

3)    शिक्षक/मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान 10 वर्षे आवश्यक

4)    शिक्षकाचे/मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.

5) पोलिस खात्याचा चारित्र्य पडताळणी दाखला.

6) विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

7) शिक्षकांनी केलेल्या लगतच्या 5 वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाव्दारे करण्यात येईल.

8) प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.

9) शिक्षकाच्या सेवेतील कार्यपध्दतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

10) शिक्षकांची मूळ नियुक्ती आदेश व खाजगी शाळांचे बाबतीत वैयक्तिक मान्यता आदेश सादर करणे आवश्यक आहे.




वरील लिंकवरून सुध्दा राज्य शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)