जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांचा उपक्रम ।
नंदुरबार ( शालेय वृतसेवा ) :
मा. शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.ओमप्रकाश बच्चुभाऊ कडू यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम म्हणून प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी स्व:खर्चाने शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे शालेय विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करून शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिक्षण हे वाघिणीचे दूध म्हटले जाते; परंतु आर्थिक अडचणीमुळे असंख्य गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. सध्याची वाढती महागाई पाहता शिक्षणासाठी लागणारे साहित्यही अतिशय महाग झाले आहेत. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी राज्याध्यक्ष विकास घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान, वृक्षारोपण, रूग्णालयात फळे वाटप अनेक उपक्रम राबिविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या आर्थिक मदतीचे चीज करून विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल भविष्य घडवावे. या मुलांना हवे ते शिक्षण घेता यावे यासाठी शक्य तितकी मदत संघटनेकडून करील. इच्छाशक्ती असेल तर माणूस कोणतेही काम जिद्दीने पूर्ण करू शकतो. शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. आदिवासी भागात विद्यार्थ्यांना पुस्तक संच व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे शैक्षणिक साहित्य या विद्यार्थ्यांना वाटण्यात आले.
विद्यार्थ्यांना वह्या, पेन, फळे व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटूंबातील मुलांचे शिक्षण अवघड झाले आहे. ही गरज लक्षात घेवून त्यांना एक हात मदतीचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे असेही जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या कविता सोमवंशी,सुरेखा पाटील, शिक्षक भरत पावरा, शिक्षक राजू मोरे उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .