पालकांसाठी.. गुणांचा फुगवटा चिंताजनक - मिलिंद ढवळे

शालेयवृत्त सेवा
0

 



जून महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल लागला लगेच बारावीचाही निकाल लागला. आणि आता सीबीएससी पॅटर्न चा  निकाल लागलेला आहे. पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनःपूर्वक स्वागत आणि त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. 


           पण यानिमित्ताने एक भयान वास्तव पालकांच्या पुढे उभे टाकू पाहते आहे. सद्यस्थितीत असलेल्या पालकांची मेरीट जर विचारात घ्यायची झाली तर, सुमारे 30 ते 40 वर्षांपूर्वी अशा सर्व पालकांना 50, 52% जास्तीत जास्त 60 टक्के असायची.60 टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा तोरा काही त्याकाळी और असायचा. सगळीकडे सत्कार व्हायचा. त्याचा दबदबा ही तसाच. मग त्या तुलनेत आत्ताच्या विद्यार्थ्यांना मिळत असलेले मार्क पाहिले तर, अगदी पूर्वीच्या पेक्षा आता डबल मार्क घेऊ लागले आहेत. 


         .मग दोघांच्या गुणवत्तेत पुढे कोण हा जो प्रश्न निर्माण झाला याची उत्तरे वेगवेगळी आहेत. पण गुणांचा फुगवटा ही पालकांसाठी अत्यंत चिंतेची बाब झालेली आहे. 90%, 95 टक्के, 99 टक्के, मार्क घेणारे मुलेही नीट सारख्या किंवा जेईई सारख्या परीक्षेत अगदी सुमार मार्कांनी पास सुद्धा होत नाहीत. मग त्यांची गुणवत्ता ही खरी का 95% ची खरी.


           साधारणतः 35 वर्षाच्या अध्यापनात सुरुवातीच्या काळात म्हणजे पारंपारिक परीक्षा पद्धती होती तेव्हा, विद्यार्थ्यांचे जर उत्तरपत्रिकेतील उत्तर चुकले असतील तर, त्याला आम्ही सर्रास नापास करत होतो. अगदी म्हणजे पास-नापास करण्याचं प्रमाण ही शाळा स्तरावर लागू होतं तेव्हा. कुठल्या पालकांना  तेव्हा रागही यायचा नाही.की कुठल्या विद्यार्थ्यालाही राग यायचा नाही. ठीक आहे. आपण अभ्यास केला नाही, आपण लिहिलं नाही म्हणून आपण नापास झालो असेल अशी खरी-खरी समजूत घेऊन त्याच वर्गात राहत असत.


          पण, परीक्षा पद्धती बदलली, मूल्यमापन पद्धती बदलली, शाळा स्तरावर क्षमता चाचण्या पासून सुरू झालेल्या गुणदान पद्धती. ते अगदी 2007 पासून सुरू झालेली आकारिक मूल्यमापन पद्धती यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणदानामध्ये प्रचंड प्रमाणात अनागोंदी वाढलेली आहे.           


            शेजारच्या मुलाच्या तुलनेत आपल्या मुलाला जास्त मार्क आहेत ना? मग ,बस झालं. अशी समजूत करून घेऊ पालक शांत आहे. पण यामुळे गेल्या दशकभरापासून सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रचंड हानिकारक बदल झालेला आहे. अस्सल गुणवत्ताधारक विद्यार्थी हे होते तिथेच राहणार. पण गुणदानाच्या अनागोंदीमुळे  गुणवत्ता नसलेल्या मुलांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


          बाहेरची जीवघेणी स्पर्धा आणि त्या स्पर्धेत पालकांची होणारी समांतर धावपळ, कोणत्याही परिस्थितीत आपल्या पाल्यांनी विशिष्ट अस ध्येय पार केलं पाहिजे.साध्य केलं पाहिजे. 


           मुलांनी ध्येय साध्य करावं असं वाटणं हे अजिबात गैर नाही. पण त्याच्यासाठी केविलवाणी धावाधाव करून त्याच्या गुणवत्तेपेक्षा त्याला वरच्या क्रमांकावर बसवण्यात पालकांना धन्यता वाटते हे गैर आहे. अगदी दहावीचा विचार केला तर शाळा स्तरावर वीस टक्के मार्क ठेवलेले आहेत . बारावीच ही असच आहे. म्हणजे 20 टक्के मोफत . बाकीचे तो अभ्यास करून घेतो, म्हणजे मुळात 60% चा असणारा पोरगा 80 टक्के वर जाऊन बसणार. आणि मग तो स्पर्धा करणार ओरिजनल वाल्या सोबत. 


          त्यामध्ये तो टिकत नाही यामुळे आता पालकांनी मुलांच्या गुणांच्या फुगवट्याबद्दल चिंता केलीच पाहिजे. एक उदाहरण म्हणून सांगतो साधारणतः पूर्वी शालेय स्तरावरचे पेपर सुद्धा तालुका आणि जिल्हा मंडळाकडून काढले जात असत. त्याकाळी असे पेपर्स काढण्यासाठी मी नेहमीच असायचा पण हे पेपर चुकूनही  स्वतःच्या पोरांना कधीच सांगितलेले नाहीत. याचा परिणाम पुढील काळात व्हायचा तोच झाला. मुलं त्यांच्या गुणवत्तेनुसार मानांकन असलेल्या ठिकाणी  नोकरी करता येईल अशा ठिकाणी पोहचली.


       स्वतः मध्यमवर्गीय तर सोडाच निम्नस्तरीय व्यवस्थेत आम्ही राहत असल्यामुळे इंग्रजीच खुळ मुलांच्या डोक्यात कधीही भिणू दिलं नाही. मराठी शाळा शिकूनच त्यांनी जे काही हस्तगत केलं त्यात तेही समाधानी आणि आम्ही दोघेही समाधानी आहोत. 


        पण हल्ली अशी स्थिती नाही. परवा माझ्या एका मित्राच्या मुलाचा बारावीचा निकाल लागला. त्याला 98 टक्के मार्क मिळाले मात्र नीट परीक्षेत त्याची विकेट  125 गुणांवर गेली.तो क्लीन बोल्ड झाला.


           त्याच्या 98 टक्के मार्क साठी माझ्या मित्रांनी केलेली धावपळ माझ्या चांगली लक्षात आहे. पण पुढे जे काय व्हायचं ते झालं. म्हणून मुलांच्या गुणवत्तेकडे प्रत्येक पालकांनी प्रतिदिन सजग राहून काम करायला हवं. आता हल्लीच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल नावाचा राक्षस आलेला आहे.  एक पथ्य मीही केलं होतं. मुलांचे भविष्याची लाईन क्लिअर होईपर्यंत स्वतः मोबाईल घेतलाच नव्हता. पुढं मग तो मुलांनीच घेऊन दिला असो. याच्यातून माझा त्याग वगैरे मला सांगायचं नाही. पण वस्तुस्थिती खूप भयाण आहे. म्हणून मार्काचा फुगवटा हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. आणि आता यावर चर्चा व्हायलाच हवी. करिता, हा प्रपंच पुन्हा एकदा खऱ्या गुणवत्ताधारकांना पुन्हा एकदा शुभेच्छा!

तूर्तास एवढेच.... धन्यवाद.....


- मिलिंद ढवळे / नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)