शिक्षकांची खरी संपत्ती म्हणजे त्यांचे विद्यार्थी होय - शिक्षक नेते मधुकर उन्हाळे

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आयुष्यभर विद्यादानाचे पवित्र कार्य करुन सेवानिवृती होत असताना शिक्षकांची खरी संपत्ती ही  आपण घडवलेले विद्यार्थी होत असे उद्गार शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी गोविंद व्यंकटराव  गाडले सहशिक्षक जिल्हा परिषद प्रा. शाळा नायगाव कॅम्प यांच्या सेवानिवृत्ती कार्य गौरव सोहळा प्रसंगी बोलत असताना शिक्षक नेते मधुकर उन्हाळे यांनी प्रतिपादन केले त्यांनी बजावलेल्या कार्याच गौरव करून शुभेच्छा दिल्या.


 या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकेचे चेअरमन  माजी आमदार वसंतराव चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर मा. जि. प. सदस्य माधवआप्पा बेळगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव विभुते ,शिवा कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस विठ्ठलराव ताकबीडे ,शिक्षक परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, शिक्षक नेते अशोक बावणे, सहकारी पतपेढी नांदेडचे चेअरमन अशोक पवळे ,सहकारी पतपेढी नांदेडचे सचिव निळकंठ चोंडे ,शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष डी. एम. पांडागळे, शिक्षण विस्तार अधिकारी एम. जे. कदम ,गुरुकृपा प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष संभाजी आलेवाड, संपर्कप्रमुख व्यंकट गंदपवाड, प्रवक्ते  राजेंद्र पाटील,  संपर्कप्रमुख संतोष साखरे ,गुरुकृपा चे सचिव बळवंत मंगनाळे, यशवंत पतसंस्थेचे सचिव विजय गबाळे, नगरसेवक दयानंद भालेराव, नगरसेवक प्रतिनिधी रविंद्र भालेराव,भास्कर पतपेढीचे चेअरमन गंगाधर तोडे,  संचालक नागेश चिंतावार ,सेवानिवृत्त शिक्षक माधवराव शिंदे, माजी गटशिक्षणाधिकारी बी.जी चिखले, भास्कर पतसंस्थेचे माजी सचिव जी.एम .शिंदे,शंकर , मावले ,डी.टी. जाधव ,संजय पचलिंग, रत्नाकर कोटूरवार ,माधव मंडलापुरे,केंद्रप्रमुख कपिलेश्वर नलबलवार,  केंद्रीय मुख्याध्यापक डी. बी. कदम  यांचे सह अनेक शिक्षक - शिक्षिका उपस्थित होते.  प्रास्तवीक शाळेचे  उपक्रमशील व तंत्रस्नेही मुख्याध्यापक शिवराज साधु यांनी केले.  


 अध्यक्षीय समारोप करताना माजी आमदार वसंतराव चव्हाण म्हणाले की, श्री व सौ गाडले पती पत्नी ने संपुर्ण सेवाकाळात शैक्षणीक व सहकार चळवळीत केलेल्या कार्याचा गौरव करुन त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे प्रामाणिक कार्य केले आहे त्यांना सेवापूर्ती च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या तसेच नायगाव कॅम्प चे मुख्याध्यापक श्री शिवराज साधु यांचे कार्य उत्तम आहेअसा उल्लेख  अध्यक्ष पदाच्या भाषणातुन मा. आ. वसंतराव चव्हाण यांनी केला. यावेळी शिक्षक नेते विठ्ठल ताकबिडे संजय कोठाळे ,अशोक पवळे ,डॉक्टर माधव विभुते, कु..वैष्णवी गाडले यांनी मनोगतातुन  श्री गाडले यांना उर्वरीत आयुष्यासाठी शुभेछा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.रोहिणी वट्टमवार,सौ.रेखा सरोदे,सौ. प्रेमलता ढेपगुंडे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)