एस.ए.मिशन हायस्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

एस.ए. मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित, एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचा सुरवातीस शाळेच्या प्राचार्य नुतनवर्षा वळवी यांचे विद्यार्थ्यांतर्फे व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दीक्षित सरांनी केले ह्या वेळी त्यांनी गुरूंची व्याख्या विद्यार्थ्यांसमोर मांडली. 


कार्यक्रमाप्रसंगी ९ वी ची विद्यार्थ्यांनी स्वाती पावरा हिने गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले तर ७ वी चा विद्यार्थी रिद्धेश नांद्रे याने अरुणीची गोष्ट,९ वी ची विद्यार्थीनी ने तन्वी पावरा हिने एकलव्यची गोष्ट विद्यार्थ्यां समोर मांडली. यानंतर ज्येष्ठ शिक्षक गर्गे सर यांनी विद्यार्थ्यां समोर शिष्याच्या आयुष्यातील गुरूंचे स्थान पटवून दिले.ह्यावेळी शाळेतील इयत्ता ६ वीचा विद्यार्थी रिषभ गावित याने नंदुरबार जिल्ह्यातून नवोदय परीक्षेत चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, ह्या दिवशी विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेच्या प्राचार्य नुतनवर्षा वळवी यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमी,मुंबई यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्कार सन २०२२ जाहीर झाला, ह्या निमित्ताने शाळेतील शिक्षकातर्फे प्रचार्यांचा  शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


 यावेळी आपल्या मनोगत मांडताना शाळेच्या प्राचार्य यांनी सांगितले हा पुरस्कार शाळेतील विद्यार्थ्यांमुळे आहे, विद्यार्थी हेच आमचे  खरे पुरस्कार आहे तसेच गुरूंचे महत्व सांगताना मॅडम म्हणाल्या की सर्व धर्मग्रंथां मध्ये गुरूचे महत्व सांगण्यात आले आहेत. आपल्या सर्वांच्या जीवनात गुरूंचे महत्व अनन्य साधारण महत्व आहे, प्रत्येकाचा आयुष्याला दिशा देण्याचे कार्य गुरू करीत असतो.


ह्या वेळी शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही.आर.पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, ज्युनिअर कॉलेज चे पर्यवेक्षक सि.पी.बोरसे, ज्येष्ठ शिक्षक ए.आर.गर्गे, अविनाश सोनेरी, छाया बच्छाव, उर्मिला मोरे, ललिता पानपाटील,रिटा वळवी, विजयालक्ष्मी नाथानी आदी उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुत्रांचालन किरण पाटील सर यांनी केले तर, आभार प्रदर्शन प्रसाद दीक्षित सरांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)