जग्मा वर्ल्ड स्कूल खेडदिगर सर्वोत्तम स्वच्छ विद्यालय पुरस्कार

शालेयवृत्त सेवा
0





नंदुरबार ( गोपाल गावित ) :

शालेय शिक्षण व साक्षरता  विभाग भारत मंत्रालय द्वाराआयोजित स्वच्छ  विद्यालय पुरस्कार २०२१-२२ या स्पर्धेतील ९५% मूल्यांकन  व ५ स्टार रेटिंग मिळवत शहादा तालुक्यातील जग्मा वर्ल्ड स्कूल ,खेडदिगर ही शाळा जिल्ह्यात सर्वोत्तम व स्वच्छ विद्यालय पुरस्कारा चे मानकरी झाली आहे. जग्मा वर्ल्ड स्कूल खेड्यात व दुर्गम परिसरात असून देखील स्वच्छता व पाणी पुरवठा श्रेणी मध्ये अव्वल ठरली आहे. शाळेला जो बहुमान मिळाला आहे त्यासाठी परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारा अंतर्गत जग्मा वर्ल्ड स्कूल ला ५ स्टार रेटिंग मिळाली आहे.


जम्मा वर्ल्ड स्कूल चे संस्थापक श्री जगदीश पाटील सर व अध्यक्ष डॉ. प्रियांक पाटील सर यांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' स्वीकारतांना "जगमा वर्ल्ड स्कूल, खेडदिगर ता. शहादा शाळेच्या संचालिका मोनालिसा पाटील यावेळी सोबत शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी तसेच उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)