इन्स्पायर अवॉर्ड योजना | INSPIRE award MANAK

शालेयवृत्त सेवा
0

 



इन्स्पायर अवॉर्ड योजना :

 INSPIRE award MANAK योजने अंतर्गत राज्यात २०२२-२३ मध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणाऱ्या सर्व शासनमान्य (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्याचे उत्तम संकल्पनेवर आधारित माडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईट वर

नामांकने सादर करावयाची आहेत. या करिता नामांकने सादर करण्याचा कालावधी ०१ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप E-MIAS portal वर नोदणी ( Registration) केलेली नाही त्यांना लवकरात नोंदणी करावी.


सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच आपल्या जिल्ह्यातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यातील नामांकनाबाबातची स्थिती वेळोवेळी त्या त्या जिल्ह्यावे जि.प. वे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात येणार आहे. 


आपण आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त नामांकने भरण्यासाठी सुरुवातीपासूनव प्रयत्न करण्याच्या दृष्टीने आपल्या अधिनस्त Inspire Award शी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना / कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात याव्यात. आपल्या जिल्ह्यातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी. असे आवाहन डा. रत्ना गुजर, संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) नागपूर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)