बिजप्लॉट येथे गुरुपौर्णिमेला लोक सहभागातून शैक्षणिक साहित्य वाटप..

शालेयवृत्त सेवा
0


  

नंदुरबार दि.१३(शालेय वृत्तसेवा) 

शहादा तालुक्यातील आमोदा केंद्रातील जिल्हा परिषद शाळा बिजप्लॉट शाळेमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी इयत्ता पहिली ते चौथी मधील एकूण ४४ विद्यार्थ्यांना पालक आणि शिक्षक यांच्या लोकसहभागातून शालेय साहित्य वाटप करण्यात. या शालेय साहित्यामध्ये (एक रेघी वही, दोन रेघी वही,चार रेघी वही, बॉक्स वही, ड्रॉइंग वही, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर व रंगीत खडू) अशा एकूण नऊ प्रकारच्या साहित्यांचा समावेश करण्यात आला होता. 


इंग्रजी माध्यमांतील शाळेतील मुलांप्रमाणेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांना सर्व सोयीयुक्त असे शिक्षण मिळावे ही आशा मनाशी बाळगून दीपक भगवान नागमल सर  सहशिक्षक आणि अनुप प्रेमसिंग राठोड मुख्याध्यापक हे दरवर्षी लोकसहभागातून आणि स्वखर्चाने विद्यार्थ्यांना वरील प्रकारच्या सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्धता करून देतात. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामपूर ग्रामपंचायतिचे नवनियुक्त ग्रामसेवक गंडे आप्पा यांना आमंत्रित करून यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 


या कार्यक्रमाला नर्मदया पावरा सरपंच देवनाथ साळवे ग्रामसेवक ,भावसिंग खर्डे,जंहांगीर खर्डे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनसिंग खर्डे, उपाध्यक्षा मनीषा विजय पावरा,मनीषा शांतीलाल पावरा मातापालक संघ, अध्यक्षा,पालक, शिक्षणप्रेमी तथा गावकरी उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अनुप प्रेमसिंग राठोड  यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)