नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :
जिल्हा नाभिक समाजहित वर्धक व कर्मचारी संस्थेमार्फत काकासाहेब हिरालाल चौधरी कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. मा.सचिन हिरे पोलीस उपअधीक्षक नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला. अमळनेरचे माजी आमदार मा.शिरीषदादा चौधरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमांत इयत्ता दहावी व बारावी ७० टक्क्यांच्या वरील प्राप्त विद्यार्थ्यांची नावे घेण्यात आलेली होते.तसेच उच्च शिक्षण झालेले विद्यार्थी BA, MA ,Bsc, Bcom ,BE , मेडीकल झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. इयत्ता दहावी व बारावीच्या प्रथम तीन क्रमांक ने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली. बाकी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
ज्ञानेश्वर सोनवणे यांनी नखचित्राच्या सहाय्याने भगवत गीता लिहिली. नखचित्राच्या सहाय्याने भागवत गीता लिहिली त्याबद्दल ज्ञानेश्वर सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला आहे. समाधान संतोष सैंदाणे यांची युवा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र देखील कार्यक्रमात देण्यात आले. समाधान सैंदाणे हे युवा कार्यकर्ते असून संस्थेच्या कामाला अविरतपणे मदत करत असतात. नाभिक समाजात अंतयात्रे समयी मदत करणारे समाज बांधव रवींद्र मंडलिक व धनराज जगताप यांचा देखील संस्थेच्या वतीने ड्रेस व साडी देऊन सत्कार करण्यात.
कार्यक्रमात ड्रॉइंग शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सचिन हिरे साहेब यांचे रेखाचित्र त्यांना भेट म्हणून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे यांनी केले संस्थेमार्फत यापुढेही असेच समाज उपयोगी विविध उपक्रम सुरूच राहतील असे त्यांनी सभेपुढे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेऊन स्वतः पुढाकार घेऊन वाटचाल सुरू करावी याबाबत मार्गदर्शन केले व नाभिक समाज प्रगती करत आहे याचं देखील त्यांनी अभिनंदन केलं.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन हिरे साहेब यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अविरत प्रयत्न केल्यास नक्कीच उच्च पदावर जाता येते असे सांगितले व विद्यार्थ्यांना जीवनाविषयीचा दृष्टिकोन सांगितला. लहान लहान विद्यार्थी आत्महत्या करतात मनाविरुद्ध गोष्ट झाली तर लगेच टोकाची भूमिका घेतात ही भूमिका अत्यंत चुकीची आहे याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डॉ. प्राध्यापक संजय महाले यांनी विद्यार्थ्यांना करिअर बाबतीत मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शाखा निवडू देण्याचे आवाहन पालकांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकला सोनवणे यांनी केले व आभार संस्थेचे सचिव अरविंद निकम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळाने प्रयत्न केले.या कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे, सचिव अरवींद निकम, सहसचिव शिवाजी मिस्तरी, कोषाध्यक्ष छगन भदाणे खापर उपाध्यक्ष हिमांशू बोरसे, उपाध्यक्ष गजेंद्र जाधव, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश देवरे नंदुरबार, सल्लागार पी.टी सोनवणे, संचालक विजय सैंदाने विजय सोनवणे, नितीन मंडलिक सुधीर निकम नवापूर ,अनिल भदाने निजामपूर, शशिकला सोनवणे, सल्लागार प्रभाकर चित्ते, शहादा, महिला जिल्हाध्यक्षा जयश्रीताई निकम नवापूर, आजीवन सभासद मयूर सूर्यवंशी, ओंकार शिरसाट, छगन सूर्यवंशी अनिता सूर्यवंशी, नरेंद्र महाले, प्रभाकर बोरसे शहादा, एकनाथ चित्ते, प्रवीण वरसाळे, गणेश पवार, भालचंद्र जगताप, प्रकाश सैदाणे नवापूर ,लक्ष्मीकांत निकम राजेश सूर्यवंशी, सेलंबा मिनाक्षी भदाणे नंदुरबार, प्रदीप सोनवणे शहादा, प्रभाकर शिरसाट नवापूर आदी नागरिक कार्यक्रमाला उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .