डी. आर. हायस्कूल मध्ये पालक-शिक्षक संघ सभा संपन्न...

शालेयवृत्त सेवा
0


नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

नंदुरबार येथील श्रीमती डी.आर. हायस्कूल येथे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी शिक्षक-पालक सभा नुकतीच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे तसेच उप मुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण आदी मान्यवर उपस्थित होते.

         

पालक-शिक्षक सभेच्या प्रास्ताविकातून  उप मुख्याध्यापक सुभाष चौधरी यांनी शाळेत राबवले जाणारे उपक्रम, शाळेची यशोगाथा पालकांसमोर समर्पकरीत्या मांडली. तदनंतर शाळेचे पर्यवेक्षक पंकज पाठक यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे शाळेमध्ये घेतले जाणारे विविध उपक्रम, विविध परीक्षा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, हिंदी, भूगोल विभाग यांच्या मार्फत घेतले जाणारे विविध उपक्रम इत्यादींचे उत्कृष्टरित्या सादरीकरण करून पालकांना यथोचीत अशी माहिती दिली.

           

तदनंतर शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी शाळेची शिक्षक-पालक संघाची कार्यकारणीची पालकांच्या संमतीने नेमणूक करून जाहीर करण्यात आली. शासकीय नियमानुसार शाळेचे मुख्याध्यापक हे  पालक-शिक्षक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तसेच उपाध्यक्ष म्हणून सुरेश चौरे, लेखाधिकारी, शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार, कार्यकारणी सचिव म्हणून ज्येष्ठ शिक्षक संजय सैंदाणे, सहसचिव मिलिंद चव्हाण तर कार्यकारणी सदस्य म्हणून इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक रवींद्र गिरासे, योगेश शिंदे, ओम चौधरी, रीना आघाव, हिरालाल मराठे, चैतराम कोकणी, संजय माळी, कैलास धनगर, सावित्रीबाई पाडवी, उमेश मोरे, अंबालाल पाटील, योगेश गिरासे, रोहित अलमेडा, गौरव पानपाटील, नूतन सोनार, घनश्याम गिरासे, मुकेश तमाईचेकर, राजेंद्र चौधरी, विजय चौधरी, विजय बडगुजर, रूपाली माहेश्वरी यांना कार्यकारणी मध्ये स्थान देण्यात आले.

          

विद्यार्थ्यांच्या समस्या व शाळेबद्दल असणाऱ्या अपेक्षा मांडण्यासाठी पालकांमधून विद्या गाभणे, राजेंद्र चौधरी, नूतन सोनार, संजय माळी यांनी स्वाध्याय तपासणी, परिवहन समिती मार्फत असणाऱ्या अपेक्षा इत्यादी काही माफक सूचना केल्या. त्यावर मुख्याध्यापक यांनी पालकांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.

    

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन संजय सैंदाणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल पाटील, दिनेश वाडेकर, अशोक वसईकर, जगदीश बच्छाव व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर पालकांना अल्पोपहार व चहापान देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)