नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा)
नंदुरबार येथील श्रीमती डी.आर. हायस्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक पंकज पाठक तर प्रमुख अतिथी म्हणून संस्कृत शिक्षक प्रशांत जानी तर व्यासपीठावर मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात दिपाली भदाणे यांनी गुरुपौर्णिमा उत्सव का साजरा केला जातो ? गुरुची महिमा काय आहे ? इत्यादी गोष्टी स्पष्ट केल्यात. गुरुपौर्णिमा निमित्ताने शाळेत दोन गटात वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता ५ वी ते ७वी. प्रथम कुणाल पाटील, द्वितीय दर्शन बंजारा, तृतीय रोशन पाटील, उत्तेजनार्थ तेजस वाडेकर, चेतन धनगर, भाविक परदेशी, हर्षवर्धन शिंदे तर इयत्ता ८ वी ते १० वी या गटात... प्रथम रामसिंग जाधव, द्वितीय मोहित मराठे, तृतीय यश बोरसे, उत्तेजनार्थ दादाभाई पाटील, प्रणील सोनवणे या विद्यार्थ्यांना कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्रे देण्यात आले. तसेच दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना कार्यक्रमात वकृत्वाची संधीही देण्यात आली. वकृत्व परीक्षेचे परीक्षण राजश्री गायकवाड व प्रशांत जानी यांनी केले. प्रमुख अतिथी प्रशांत जानी यांनी गुरुचा महिमा, दिवसेंदिवस गुरुप्रती कमी होत जाणारा आदर, आई-वडील हे आपले पहिले गुरू व महर्षी व्यास यांच्या बद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना बौद्धिक खाद्य दिले.
अध्यक्षीय समारोपात पंकज पाठक यांनी गुरु म्हणजे सर्वोच्च, आयुष्यात प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकत असतो ते सुद्धा आपले गुरुच आहे, विद्यार्थी हे शिक्षकांचे दैवत , महर्षी व्यासांपासून तर आजच्या आधुनिक शिक्षकांपर्यंत भारत देशास गुरुपरंपरा लाभलेली आहे इत्यादी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल जोशी तर आभार प्रदर्शन निलेश गावित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .