डी. आर. हायस्कूल मध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा...

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार  ( गोपाल गावित ) :

येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल येथे जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून भूगोल शिक्षक विशाल मच्छले तसेच शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण, ज्येष्ठ शिक्षिका राजश्री गायकवाड आदी होते. 


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून भरत पेंढारकर यांनी जागतिक स्तरावर लोकसंख्या दिन साजरा करण्याचे कारण स्पष्ट केले. तसेच प्रणिल सोनवणे या विद्यार्थ्याने भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत लोकसंख्येचा विस्फोट कसा झाला आहे व तो देशाला व जगाला किती घातक आहे हे सुंदररित्या स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व अतिथी विशाल मच्छले यांनी भारताचा वाढत जाणारा जन्मदर, कमी होणारा मृत्यू दर, वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी बेरोजगारी, गुन्हेगारी, समस्या  व यावर उपाययोजना इ. गोष्टी स्पष्ट केल्यात.


 अध्यक्षीय भाषणात उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी यांनी शेती योग्य जमीन आता निवासासाठी वापरली गेल्यामुळे कसे अन्नधान्य उत्पादन कमी होत आहे व भूकमारी, बेरोजगारी कसे डोके वर काढत आहेत, यासाठी विद्यार्थी म्हणून आपण काय केले पाहिजे इत्यादी गोष्टी आपल्या मनोगत व्यक्त केल्या. लोकसंख्या दिनानिमित्ताने शाळेत चित्ररंगभरण व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्यातील यशस्वी विद्यार्थी चित्ररंगभरण स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी...  प्रथम कार्तिक मराठे, द्वितीय तेजस वाडेकर, तृतीय जयान लोहार, चतुर्थ मयूर गवते, पंचम हिमांशू पगारे, उत्तेजनार्थ दिशान राजपूत, अलोक सोनवणे तसेच इयत्ता ८ वी ते १० वी चित्ररंगभरण स्पर्धा.प्रथम मयूर राठोड, द्वितीय सिद्धार्थ थोरात, तृतीय कबीर जाधव, चतुर्थ भावे सोनार, पंचम सार्थक पवार, उत्तेजनार्थ उदय चौधरी, गौरव पाटील.


तसेच लोकसंख्या दिन विशेष घोषवाक्य स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी...  प्रथम प्रतीक गोसावी, द्वितीय मोहित बावा, तृतीय निखिल सूर्यवंशी, चतुर्थ आर्यन गावित, पंचम तेजस वाडेकर, उत्तेजनार्थ श्रीदत्त पाटील, कुणाल पाटील या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार कविता भंडारी तर सूत्रसंचालन भरत पेंढारकर यांनी केले. चित्र रंगभरण स्पर्धेचे परीक्षण चित्रकला शिक्षक देवेंद्र कुलकर्णी तर घोषवाक्य स्पर्धेचे परीक्षण राजेंद्र लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे, दिनेश वाडेकर, निलेश गावित, हेमंत खैरनार व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)