'मी कसा घडलो ' या उपक्रमांतर्गत राज्य पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध व्याख्याते डॉ नंदकिशोर उत्तमराव डंबाळे यांचे व्याख्यान..

शालेयवृत्त सेवा
0

 



जालना ( शालेय वृत्तसेवा ) .

अंबड तालुक्यातील कर्जत येथील राजुरेश्वर विद्यालयात  'मी कसा घडलो' या उपक्रमांतर्गत गोल्डन ज्युबिली स्कूल,जालना येथील मराठी शिक्षक तसेच जिल्हा,विभाग व राज्य पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध व्याख्याते डॉ नंदकिशोर उत्तमराव डंबाळे सरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर व्याख्यान दिले मार्गदर्शन केले.


डॉ डंबाळे सरांनी स्वतःच्या आयुष्यात सामान्य  परिस्थितीतून पीएचडी पर्यंतचा प्रवास यशस्वी शिक्षक,वक्ता ते प्रसिद्ध कीर्तनकार होण्यापर्यंतचा स्वतःचा खडतर व यशस्वी जीवनाबद्दलचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला.प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात सकारात्मक,प्रयत्नवादी व ध्येयवादी कसे राहावे, आपल्या अभ्यासात सातत्य ठेवून यशस्वी कसे व्हावे हे अनेक उदाहरणे व गोष्टींच्या आधारे सांगितले.आपल्या आयुष्यात अशक्य असे काहीच नसते,स्वतःला कधीही कमी लेखू नये व आपले ध्येय नेहमी निश्चित कसे असावे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच स्वलिखित जीडीसी अँड ए आणि असेल दृष्टी तर सजेल सृष्टी या पुस्तकांचे 5 संच विद्यालयास भेट म्हणून दिले.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी जिप सदस्य भीमराव डोंगरे आबा तर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र शर्मा हे होते.कार्यक्रमाचे संचलन बुनगे सरांनी केले प्रास्ताविक प्राचार्य टकले सरांनी केले तर प्रमुख वक्त्यांची ओळख-परिचय उंडे सरांनी करून दिला तर आभार वीर सरांनी मानले. याप्रसंगी प्राचार्य विलास टकले,अंकुश वीर,धनाजी जाधव,पुंजाराम अहिरे,सचिन टेकाळे,सुंदर बुनगे,ज्ञानेश्वर पैठणे,वैभव मुळी,अभिजीत उंडे,प्रा.ओमप्रकाश घुगे,प्रा.सुभाष जीगे,प्रा.भरत शेरे,भिकन कोकणी,मनोहर मिसाळ,विष्णू घुगे,अशोक उगले,वाल्मीक सपकाळ,विलास घुले आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)