डी. आर. हायस्कूल मध्ये राष्ट्रीय कबड्डी दिवस साजरा

शालेयवृत्त सेवा
0



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा) ;

नंदुरबार येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल येथे राष्ट्रीय कबड्डी दिन इयत्ता नववी दहावीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी प्रत्यक्ष कबड्डीचे सामने खेळून साजरा केला. सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक यांनी श्रीफळ वाढवून कबड्डी सामन्यांची सुरुवात केली.


इयत्ता ९ वी व १० वीचे दहा तुकड्यांचे १० संघ यावेळेस तयार करण्यात आले व एकूण नऊ मॅचेस खेळवण्यात आल्या व अंतिम सामना इयत्ता ९ वी क आणि इयत्ता १० वी ब या वर्गांच्या संघांमध्ये रंगला व इयत्ता ९ वी क च्या संघाने विजेतेपद तर १० वी ब च्या संघाने उपविजेतेपद मिळवले. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळण्याचा मनसोक्त असा आनंद लुटला. संगीतमय वातावरण, विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांची सुद्धा कबड्डीची स्पर्धा, आकाशातून अधून मधून वरूण  देवताची हजेरी असे जणू एकंदरीत संपूर्ण वातावरण हे क्रीडामय झाले होते. या सर्व यशस्वी संघांना इयत्ता ९ वी व १० वीचे वर्गशिक्षक तसेच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी जवळपास २५०० रुपयांचे बक्षीस यानिमित्ताने जाहीर केले. 


सर्वांनी अतिशय मनमुरादपणे खेळण्याचा आनंद लुटला व खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कबड्डी दिवस साजरा करण्यात आला.या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा विभाग प्रमुख जगदीश बच्छाव, क्रीडा शिक्षक निलेश गावित, अशोक वसईकर, योगेश गवते, घनश्याम लांबोळे, दिनेश वाडेकर, मिलिंद चव्हाण, तुषार नांद्रे, रवींद्र पाटील आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)