नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचा इशारा ११ जुलै नुसार जिल्ह्यात होणार असलेल्या अतिवृष्टी व पुराची संभावना पाहता शाळांना दोन दिवसाची सुट्टी जाहीर करण्याबाबतचे पत्र माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चा नुसार एका दिवसाची ( 13 जुलै ) सुट्टी जाहिर करण्यात आली होती. आता अजून एका दिवसाची ( 14 जुलै ) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
उपरोक्त विषय प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचा इशारा 11 जुलै 2022 नुसार नांदेड जिल्ह्यात दिनांक 13 जुलै 2022 रोजी अतिवृष्टीचा धोका असल्याने निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे संभाव्य पुराची परिस्थिती विचारात घेता नांदेड जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिनांक 14 जुलै 2022 या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .