जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत केले वृक्षारोपण.. | DIET Nandurbar

शालेयवृत्त सेवा
0

 



 नंदुरबार (गोपाल गावीत प्रतिनिधी) :

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील शासकीय इमारतीच्या आवारात नुकतेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हा शिक्षण व शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .


सदर वृक्षारोपणाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षणाच्या निमित्ताने उपस्थित ९५ शिक्षकांनी प्रत्येकी एक वृक्ष लावून जिल्ह्याच्या शिक्षणाच्या शिखर संस्थेत वृक्षारोपण केले. सदर वृक्षारोपण साठी पूर्वनियोजन अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांच्या संकल्पनेतून झाल्याने अवघ्या पंधरा मिनिटात १०० वृक्षांचे रोपण करून वृक्ष संवर्धनासाठी चा संकल्प पूर्णत्वास आला.


सदर वृक्षारोपणा प्रसंगी अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन ,डॉ. वनमाला पवार, पंढरीनाथ जाधव, सुभाष वसावे उपस्थित होते. तसेच या कार्यासाठी  अनिल सोनवणे, मनोज खैरनार, पानाजी वळवी, संजय निकम यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)