परिवर्धा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



 नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या नियोजनानुसार शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्राची शिक्षण परिषद गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली.शिक्षण परिषदेच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन मोहन भाऊ शेवाळे जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार, श्रीमती ममता पटेल शिक्षण विस्तार अधिकारी शहादा नंबर एक बीट, सुकलाल चौधरी केंद्रप्रमुख परिवर्धा यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी माध्यमिक विद्यालय परिवर्धा शाळेचे मुख्याध्यापक जगदीश भाई पाटील के. डी. गावित माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज कदम, सर्व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. सुकलाल चौधरी केंद्रप्रमुख परिवर्धा यांनी पीपीटीच्या साह्याने शिक्षण परिषद वार्षिक मागोवा २०२१-२२ बाबत मार्गदर्शन केले. 


त्यानंतर शैक्षणिक प्रक्रिया शिक्षण परिषद हा विषय श्रीमती मनीषा गावडे जि. प.शाळा वाघोदा यांनी पीपीटी द्वारे आवश्यक बाबीची चर्चा घडवून सखोल मार्गदर्शन केले. मनोजकुमार राठोड जि.प.शाळा कोठली यांनी केंद्र संसाधन समूहाची व्याख्या स्थापनेचा उद्देश स्थापना व रचना आणि सीक्यूसी सदस्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022 23 प्रभावी राबविण्याकरता चर्चा हा विषय श्रीमती स्नेहल गुगळे जि.प. शाळा कलसाडी याविषयी माहिती दिली. 


शाळा पूर्वतयारी शाळा निहाय आढावा व मेळावा उपक्रमाबाबत चर्चा हा विषय काथर्दे खुर्द शाळेतील शिक्षक तुकाराम अलट यांनी अतिशय मनोरंजनात्मक आणि उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. विद्याप्रवेश या विषयाबद्दल शक्ती धनके सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.


केंद्रातील शैक्षणिक गरजा विद्यार्थी स्थलांतर रोखणे व उपस्थिती वाढवणे बाबत प्रशासकीय सूचना केंद्रप्रमुख सुकलाल चौधरी यांनी दिल्या. खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषद संपन्न झाली. उपस्थित शिक्षण परिषदेत सर्व शिक्षक बांधवांचे आभार प्रदर्शन जयवंत जोशी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)