नियोजन भवनात तंत्रस्नेही शिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न
नांदेड (शालेय वृत्तसेवा)
जिल्हा परिषदेच्या शिक्षकासमोर मोठी आव्हाने आहेत ही आव्हाने पेलण्यासाठी शिक्षकाने तंत्रस्नेही होऊन स्मार्ट शिकवणीतून विद्यार्थ्यांना शिक्षित केले पाहिजे. विद्यार्थ्याला एखादी बाब येत नसेल आणि ती शिक्षकांना सोडून दिली तर मुलगा मागे जातो आणि तो कायम शाळाबाहय होतो. त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थी केंद्रित शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी येथील तंत्र स्नेही शिक्षकांच्या प्रशिक्षणात केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नियोजन भवन येथे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या समवेत त्यांच्या भगिनी डॉ. कल्पना मेहता, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे , माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर , उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे व बंडू अंमदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जयम सोलुशन आणि ग्लोबिन इंडस्ट्रीजच्या वतीने जिल्ह्यातील 170 डिजिटल शाळा मधील शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी डिजिटल शाळा हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. कोविड काळात विद्यार्थी दुरावले होते जगासोबत आता जोडले जात आहोत असे सांगून विद्यार्थ्यांना ऑनलाइन एज्युकेशन देताना डोळ्यांनी अध्ययन अनुभूती वाढवता येते असे सांगितले. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी डिजिटल शाळांसाठी स्थापन करताना आलेल्या अडचणी सांगितल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आग्रह डिजिटल शाळेत अनेक नवीन संकल्पना येत आहेत. डोळ्याला दिसेल का ? मुलांचे संबोध स्पष्ट होतील ? असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. विलास ढवळे यांनी केले. या प्रशिक्षणाचा 170 शाळांना याचा लाभ झाला असून यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या गतीने शिक्षण घेता येणार आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .