" शैक्षणिक संस्थांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा ॲक्शन प्लॅन तयार करून सुरक्षिततेसाठी उपाययोजना करावी विचारवंत व समीक्षक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांचे आवाहन..

शालेयवृत्त सेवा
0

 



प्राचार्य डॉ.सतिश पाटील व बाबाराव डोईजड लिखीत "शैक्षणिक व्यवस्थापन,प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन" या पुस्तकाचे प्रकाशन !


पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

शैक्षणिक क्षेत्रात शाळा महाविद्यालयाच्या सुरक्षेत बाबतचा ॲक्शन प्लॅन तयार करून पूर्वतयारीचे व्यवस्थापन आणीबाणीच्या संकटात मुकाबला करताना आपत्ती व्यवस्थापनाची कार्यप्रणाली प्रभावीपणे राबवली गेली तर संकटाशी सामना करण्याचे बळ प्राप्त होते. जनजागृती व लोक शिक्षणातून व्यापक प्रमाणात आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रबोधन होणे आवश्यक आहे. परिणामकारक रीतीने शैक्षणिक संस्थांचा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यासारखे काम प्रशिक्षण नियमाच्या माध्यमातून घडवून आणण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यरत करण्याचे कार्य संबंधित घटक करतात.


 ‌  कोणत्याही परिस्थितीत सूत्रबद्ध व मार्गदर्शक तत्त्वानुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यवाही केल्यास सुरक्षेतेच्या बाबतीत उद्दिष्ट सफल होईल असे विचार सुप्रसिद्ध विचारवंत समीक्षक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ.श्रीपालजी सबनीस यांनी व्यक्त केले शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर शिक्षण क्षेत्रातील तज्ञ सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त लेखक प्राचार्य डॉ.सतीश पाटील तज्ञ मार्गदर्शक व लेखक बाबाराव डोईजड लिखित पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक श्री रमाकांत काठमोरे प्राचार्य डॉ.श्रीपालजी सबनीस कवी साहित्यिक  प्रदीप पाटील उपसंचालक डॉक्टर श्रीमती कमलादेवी आवटे व समता कक्षाच्या प्राचार्य उपसंचालक डॉक्टर नेहा बेलसरे यांचे हस्ते पुण्यात झाले त्यावेळी ते बोलत होते.


     यावेळी एस. सी. आर. टी. चे उपसंचालक रमाकांत काठमोरे उपसंचालक डॉ. कमलादेवी आपटे व डॉ. नेहा बेलसरे साहित्यिक प्रदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या धोका मुक्त शैक्षणिक संस्था सुरक्षित वातावरण अडथळे मुक्त शाळा करण्यासाठी व शाळा महाविद्यालयांमध्ये सुरक्षतेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनावर जनजागृती व्हावी शैक्षणिक क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रत्येक कृतीचे प्रतिबिंब उमटते त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात सदर पुस्तक निश्चितच आपल्या सर्वांना मदत कार्यासाठी व आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल असे लेखक डॉ. प्राचार्य सतीश पाटील यांनी सांगितले तसेच सूत्रसंचालक प्राचार्य धोंडीबा तरटे पुणे तर आभार प्रदर्शन लेखक तज्ञ मार्गदर्शक बाबाराव डोईजड ( देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा )यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)