चला ऑक्सीजन पेरूया.. भापकरवस्ती जिल्हा परिषद शाळेतील अनोखा उपक्रम !

शालेयवृत्त सेवा
0

 



अहमदनगर ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापकरवस्ती येथे एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चला ऑक्सिजन पेरुया..या उपक्रमांतर्गत  शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 5-5 झाडांची रोपे तयार करून आणून शाळेत रोपवाटिका तयार केली. 


या विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेचे उदघाटन सालवडगावचे सरपंच मा.श्री अण्णासाहेब रुईकर, शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संदीप कमानदार यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी सदस्य सुरेश म्हस्के, आदिनाथ बोडखे,शाळेच्या मुख्या.आरती तागडे,अंगणवाडी ताई शारदा भापकर,  श्रीकांता शिंदे उपस्थित होते, याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त श्रीकांत  शिंदे मॅडम यांनी "वृक्षारोपण करूया ऑक्सिजन पेरुया " असा संकल्प करावा असे आव्हान केले.


श्र्वासाची तरी किंमत मोजुया..

एका दिवसात एक माणूस 3 सिलेंडर भरतील इतक्या प्राणवायू चे सेवन करतो, एका सिलेंडर ची किंमत 700 रू. म्हणजे एका दिवसाला 2100 रू. चा ऑक्सिजन,या हिशोबाने दर वर्षाला 7 लाख 66 हजार 500 रू. चा,सरासरी माणूस 65 वर्षे जगला तर 5 कोटी रु. चा ऑक्सिजन लागतो हा ऑक्सजन झाडे माणसाला फुकट देतात मग आपल्या ऑक्सिजन ची सोय व्हावी म्हणून तरी या उपक्रमात सहभाग घ्या व घरातील मंगल प्रसंगी झाडे लावण्याचा संकल्प करा.


तर चला तर लवकर झाडे लावू, ऑक्सिजन पेरू शाळेपासून घरापर्यंत समाजात या उपक्रमाचे स्वागत करू या कारण निसर्ग हाच देव आहे . .

झाडे फुले फळे पक्षी - हीच तर निसर्गाची खरी नक्षी ! "


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)