शालेय विषयाच्या व भाषांच्या समित्या गठीत होणार!

शालेयवृत्त सेवा
0

 





मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती ही संस्था १९६७ पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक व पूरक साहित्य तयार करत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आलेले आहे. या अनुषंगाने पाठ्यपुस्तकांच्या व पूरक साहित्याच्या लेखन-संपादन, चित्राकृती इत्यादी कामासाठी शैक्षणिक स्तर व माध्यमनिहाय विविध विषयांच्या व भाषांच्या समित्या गठीत करण्यात येणार आहेत. 


यासाठी भाषा व विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे तसेच आवश्यकतेनुसार पाठ्यपुस्तकांतील चित्राकृती तयार करण्यासाठी चित्रकारांची माहिती मिळवणे या उद्देशाने सोबतच्या लिंकवर अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी त्या त्या विषयातील तज्ज्ञ आणि इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी आपले अर्ज ऑनलाईन भरावेत. निवड समितीमार्फत योग्य त्या पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे. या समित्यावरील सदस्य निवडीसाठी शाळा मुख्याध्यापक व व्यवस्थापकाचे मंजुरी पत्र आवश्यक असणार आहे. 


सदर अर्ज भरण्यासाठी लिंक सध्या शिक्षकांच्या whatsapp ग्रुपमध्ये वायरल होत आहे.

https://academics.balbharati.in /newcommittees2022


नव्या शैक्षणिक धोरणाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे या धर्तीवर नवी पाठ्यपुस्तके तयार होतील व त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल अशी प्रतिक्रिया क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल सरांनी व्यक्त केली. अध्ययन व अध्यापन प्रक्रियेसाठी बालभारतीच्या पुस्तकांचा दर्जा हा नेहमीच उच्च प्रतीचा राहिला व तो यापुढेही असाच राहील असे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)