शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा करणार -पुरुषोत्तम काळे

शालेयवृत्त सेवा
0

 


 

नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

शिक्षक परिषदेच्या अक्कलकुवा तालुकास्तरीय संपर्क मेळाव्यात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा अक्कलकुवा- जिल्हा शिक्षक परिषदेतर्फे शिक्षक संपर्क अभियानांतर्गत अक्कलकुवा येथील पंचायत समितीच्या दिगंबर पाडवी सभागृहात तालुकास्तरीय संपर्क  मेळावा राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी तालुकास्तरावर जाऊन शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात येऊन सामान्य शिक्षकाचे  वैयक्तिक व सामूहिक प्रश्न जाणून घेण्याचा उपक्रम  होत आहे. या उपक्रमाचे उपस्थित शिक्षकांनी स्वागत केले आहे. 


मेळाव्याच्या सुरुवातीला उपस्थित शिक्षकांनी विविध प्रश्न व समस्या मांडल्या. नियमित पदोन्नती, दरमहा जीवन वेतन, ZPFMS च्या अशासकीय कपाती, सातव्या वेतन आयोगाच्या दुसरा व तिसरा हप्ता, वरिष्ठ व निवड श्रेण, ५% बांधकाम निधी, पदोन्नती नाकारणार्‍या शिक्षकांचे वसुल केलेले वेतन, वैदकीय बिल, जीपीएफ प्रस्ताव, सेवा पुस्तक नोंदी, वेतनश्रेणी पडताळणी शिबिर, गोपनिय अहवाल, अशैक्षणिक कामकाज, अनावश्यक टपाल माहिती, वसतीशाळा शिक्षक वेतन आदी विषयांवर उपस्थित शिक्षकांनी प्रश्न मांडले. यावर  जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी उत्तरे देऊन जिल्हास्तरावरील प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.


शिक्षक परिषदेने आजवर केलेल्या कामाची व कार्यपद्धतीची माहिती विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागीय सदस्य आबा बच्छाव, जिल्हा कार्यवाह किरण घरटे, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश पाडवी यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त  केली. यावेळी जिल्हा नेते देवेंद्र बोरसे, कोषाध्यक्ष शरद घुगे, कार्याध्यक्ष दिनेश मोरे, संघटनमंत्री प्रकाश बोरसे, कार्यलीयन मंत्री जगदीश पाटील  सहकार्यवाह भगवान मोरे, सहससंपर्क प्रमुख संदीप खेडकर, प्रसिद्धीप्रमुख मनोज चौधरी, महिला आघाडी सहकार्यवाह वंदना न्हावडे यांची विशेष उपस्थिती लाभली. 


पुरुषोत्तम काळे यांनी राष्ट्रहित, शिक्षणहीत, विद्यार्थीहित, शिक्षकहीत या राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन शिक्षक परिषद राज्यात २८ जिल्ह्यात व नंदुरबार जिल्ह्यात सक्रियपणे कार्य करत असून परिषदेने जिल्ह्यात राबविलेल्या  शिवजयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिर , जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा, बिरसा मुंडा जयंती सामूहिक संविधान उद्देशिका वाचन व भारत माता पूजन, रावलापाणी सत्याग्रहातील शहीदांना अभिवादन, शिक्षक परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी उपक्रमातून राष्ट्रभक्ती निर्माण करून  सामाजिक समरसता निर्माण करण्याचा प्रयत्न असून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हा विभाग व  राज्य स्तरावर पाठपुरावा करून सोडविण्याससाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे काळे यांनी सांगितले. तसेच शिक्षक परिषदेने आजवर राज्य स्तरावर सोडवलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दिपक सोनवणे यांनी तर सुत्रसंचलन सहकार्यवाह जगदीश धसे यांनी केले. आभार प्रदर्शन रुपेश मोरे यांनी मानले. मेळावा यशस्वीतितेसाठी भाऊसाहेब जाधव, दीपक वसावे, जालिंदर वसावे, सचिन बडोले, सुदाम राठोड, रुपेश मोरे, हेमराज माळी, कांतीलाल वसावे, किसन वसावे, जगदीश पाडवी, दिपक कांदे, बालाजी गुरनाळे, रोहिदास पावरा, गणेश नाईक, श्री.धुळे, श्री.शेंडगे, अंजना कलाल यांचे अनमोल सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)