अपघातात मदतीसाठी पुढे येणाऱ्या व्यक्तींचा होणार सन्मान ; माहिती सादर करण्याचे नागरिकांना आवाहन | Help in Accident

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (शालेय वृत्तसेवा) : 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रस्त्यावर वाहन चालविताना अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना दवाखान्यात नेणे व त्यांना मदत करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे याबाबतची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे देण्यात आली आहे.


वाहन अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करणे किंवा त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. आपण मदत केली असल्यास त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक किंवा पोलीस विभागाकडून निर्गमित करण्यात आलेले प्रमाणपत्र किंवा वर्तमानपत्रात आलेल्या बातमीसह आपली माहिती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयास शनिवार पर्यंत ( 9 जुलै ) सादर करावे असे आवाहन नांदेडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)