वसंतराव नाईक हे आधुनिक महाराष्ट्राचे जनक - तहसीलदार किशोर यादव

शालेयवृत्त सेवा
0

 


कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवड करून दिली ' चला ऑक्सीजन पेरुया ' ला दिली साद !

.

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :  

वसंतराव नाईक केवळ हरित क्रांतीचे प्रेणेते नव्हते तर श्वेतक्रांती, म्हाडा,सिडको, रोजगार हमी योजना, महाराष्ट्र पंचायतराज कायदा,चार कृषी विद्यापीठांची निर्मिती, कमाल जमीन धारणा कायदा, कापुस एकाधिकार योजना, मराठीला राजभाषेचा दर्जा, कोयना भुकंपग्रस्तांचे पुनर्वसन, कोयना, येलदरी, अप्पर वर्धा, उजनी, जायकवाडी सह अनेक धरणे, महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ, बियाणे महामंडळ,पारस, परळी, चंद्रपुरसह अनेक विद्युत प्रकल्प,वानखेडे स्टेडियम मुंबई,नवी मुंबई सह अनेक लोकाभिमुख प्रकल्प व योजनेचे ते जनक होते. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास नाईक साहेबांनी केला असे प्रतिपादन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले. 


लांजी जिल्हा परिषद शाळेत कृषी दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, माजी सभापती मारुती रेकुलवार , आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार , प्रकल्प अधिकारी संजीव राठोड ,विस्तार अधिकारी रमेश गावंडे , सरपंच इंदल पवार, उपसरपंच संतोष कोपुलवार ,ग्रामपंचायत सदस्य किशोर राठोड , सिंधुताई राठोड, रमेश राठोड , अतिष देवपूलवार, अमर जाधव , संतोष कमठेवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 


प्रस्ताविक व संचलन मुख्याध्यापक अरविंद जाधव तर आभार विष्णू राऊत यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अरविंद जाधव, यांच्यासह रणधीर पतंगराव , राहुल कायटे, विष्णू राऊत, मिलिंद काळेवार, सुनील अंबुलकर यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)