शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांची भेट ; शिक्षण सचिव अनुकुल !
मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे )
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद शिष्टमंडळाने शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांची भेट घेतली. त्यात वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शाळा सुरू झाल्यानंतर सुरू झाल्यामुळे दैनंदिन अध्यापनातून ,तसेच सेतू अभ्यास त्यामुळे ट्रेनिंग पूर्ण करण्यात उशीर होत आहे त्यामुळे पुढील दोन महिने वरिष्ठ व निवड श्रेणी चे प्रशिक्षण कालावधी वाढविण्याची मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली ती मागणी शालेय शिक्षण प्रधान सचिवांनी तात्काळ मान्य केली.
शिक्षण सचिवांची आज मंत्रालयात त्यांच्या दालनात शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यावेळी परिषदेचे अध्यक्ष वेनुनाथ कडू, मुंबई कार्यवाहक शिवनाथ दराडे, रात्र शाळा संयोजक निरंजन गिरी, संतोष धावडे, ज्ञानेश्वर पवार आदी परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा केला जाणार असून यावर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमार्फत भारत माता पूजन व क्रांतिकारकांच्या जीवनपट/ कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक ऑगस्ट 2022 रोजी हा जनजागरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी या राष्ट्रीय कार्यक्रमास शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली, त्यासाठी प्रधान सचिवांना त्यांच्या दालनात जाऊन परिषदेच्या शिष्टमंडळाने सविस्तर निवेदन दिले. त्यावर शिक्षण सचिव देओल यांनी यावर शासन सकारात्मक असेल असे आश्वासन दिले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .