वरिष्ठ / निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट : प्रशिक्षणाचा कालावधी दिला वाढवून.. | Senior Selection Category Training

शालेयवृत्त सेवा
0

 



 31 जुलै पर्यंत प्रशिक्षण पूर्ण करावे ..


पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण 2021 - 22 दिनांक 1 जून 2022 पासून राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन स्वरूपात यशस्वीरित्या सुरू आहे. राज्यात एकूण 94541 प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेली होती. यापैकी दिनांक 14 जुलै 2022 रोजी पर्यंत 52551 प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले असून उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत अशा उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण दिनांक 31 जुलै 2022 पूर्वी पूर्ण करावे. असे पत्राव्दारे कळविले आहे.



तथापि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण त्यांच्या ईमेल मध्ये असणाऱ्या दुरुस्ती प्रशिक्षण गट व प्रकार यामध्ये असणाऱ्या त्रुटी यामुळे उशिरा सुरू झाले आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरू झालेल्या दिनांकापासून पुढील 45 दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे. तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक 23 व 24 जुलै 2022 रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मार्फत सेवा अद्यावतीकरण या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस कृपया प्रणालीचा वापर करू नये दिनांक 25 जुलै 2022 पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरू असेल तरी याची नोंद घेण्यात यावी. सदर सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या सर्व अध्यायवत सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)