जुने धडगाव केंद्रातिल विद्यार्थ्यांचे होते कौतूक आणि शिक्षकांचे होत आहे अभिनंदन !
नंदुरबार (प्रतिनिधी गोपाल गावीत) :
सातपुडा पर्वत रांगा मधील धडगाव तालुक्यातील जुने धडगाव जि.प.केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात मिरीट लिस्टमध्ये इ.६ वी साठी १३ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे खुप खुप अभिनंदन शाळेमार्फत करण्यात आले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे नावे- श्रुतिका दिपक पावरा, विराट राजेश देवकर, निर्मय प्रविण वळवी, विकी खुमानसिंग वळवी, कृतिका गुलाबसिंग वळवी, खुशी मंगल पावरा, हिमांशु श्रीकांत शिवदे, अर्जुन दिलवरसिंग पावरा, तन्वी दिनेश शिंदे, अनुकुमार गणेश पाडवी, अंकुर अमोल ठिंगळे, प्रतिक्षा रतनसिंग वळवी, रोहित गोविंद वसावे ह्या १३ विद्यार्थांची निवड झाली आहे.
जि.प.केंद्रशाळा जुने धडगाव येथील एकलव्य माँडेल रेसिडेंशिएल स्कूल प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा सन २०२१-२२ मध्ये गुणवत्ता यादीत एकूण ४० विद्यार्थींची ( इ . ६ वी , ७ वी, ८ वी प्रवेशासाठी निवड झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोकदादा पराडके, मुख्याध्यापक पांडुरंग पाटील, वर्गशिक्षक सुनंदा निकवाडे, विद्या पाटील, रंजू वाडीले, मीना गावीत, प्रमोद बोरसे, सुवर्णा पाटील, ललिता पावरा, नारसिंग वसावे, सुरेंद्र जोशी, रंजिता गावीत, शशिकला पवार, होमी वळवी, प्रदीप दरेकर तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.
सातपुडा पर्वताच्या रांगामध्ये अतिदुर्गम भागात असणारी जिल्हा परिषदेची जुने धडगाव प्राथमिक शाळा इंग्रजी शाळांनाही मागे टाकणारी. इथली पहिलीत शिकणारी मुलं १९ खडी अध्यापन पद्धतीच्या आधारे अवघड असे जोडशब्दही सफाईदार वाचतात. शैक्षणिक अध्यापनाबरोबरच अन्य सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणारी शाळा म्हणून उल्लेख करावा लागेल. वर्गखोल्यापुढील झाडे, खेळण्यासाठी प्रशस्त मैदान असा एकंदरीत शाळेचा परिसर आनंददायी वातावरणात वेगवेगळे सण-उत्सव साजरे करुन मुलांमध्ये पारंपरिक ज्ञान दिले जाते. अशा उपक्रमातून बाह्यजगाची ओळख, व्यवहारज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो.
वाचन- लेखनाबरोबरच गणिती क्रिया इथली मुले अचूकपणे करतात. त्यामुळे यावर्षी या शाळेचा पटही लक्षणीय दिसून येतो. विद्यार्थ्यांना केवळ शिकवण्याचे नाही तर घडवण्याचे काम केंद्रशाळा जुने धडगाव म्हणजे गुणवत्तापूर्ण ब्रँड आहे. कौशल्यपुर्ण शिक्षक असला तर त्याचाही कस लागतो आणि पैलू हिर्यासारखं चमकता तर पालक देखील खूप जागरुकता आहे. विद्यार्थी १०-१२ कि.मी डोंगर चढून व उतरून शाळेत येतात त्यांची जिद्द आणि चिकाटी विद्यार्थांमध्ये आहे. असेही मुख्याध्यापक पांडुरंग पाटील यांनी सांगितले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .