कृषी दिनानिमित्त नांदेड जिल्ह्याच्या सर्व शाळांमध्ये होणार शेती आणि शेतकऱ्यांचा जागर - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे CEO Varsha Thakur

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे मोठ्या गौरवाने पाहिले जाते कृषी क्षेत्र से निगडित निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या आव्हानातून स्वतःला सावरत शेतीला सावरण्याचे महत्त्वपूर्ण जबाबदारी शेतकऱ्याने समर्थपणे पेलवली आहे त्यांच्या कष्टाचा त्यागाचा श्रमात आहे . गौरव होण्यासमवेत नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांचा जागर करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेने घेतला आहे.


या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या शाळेत शिकणाऱ्या नव्या पिढीला शेती विषयी अधिक लळा लागावा आवड उत्पन्न व्हावी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रगतीशील शेतीचा मंत्र त्यांच्या मनात रुजावा या उद्देशाने हा अभिनव उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले.


या अभिनव उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातील काही निवडक गावात वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही देण्यात आले आहे याचबरोबर पाण्याचे मूळ लक्षात यावे यासाठी जल पूजन पाणी बचतीसाठी व जमिनीत मुरविण्यासाठी पुनर्भरण आपल्या शेतात उत्पादित झालेल्या गुणवत्तापूर्ण बियाणांना बाजूला काढून पेरणीपूर्वी त्यांची तपासणी करण्याच्या उद्देशाने आवश्यक असलेली बीज प्रक्रिया बीपीएफ पद्धतीने पेरणे आदीबाबत माहिती ही विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आपली शेती आणि आपला गाव याविषयी आत्मविश्वासमृद्धींगत व्हावा या दृष्टीने शाळांमध्ये शेतीशी निगडित माहिती पोहोचवली जाणार आहे यात आपल्या राज्यातील पिके जिल्ह्यातील पिके हरित क्रांतीतून साधलेली स्वयंपूर्ण गळीत राहण्याच्या उत्पादनासाठी स्वावलंबी बाणा सोयाबीन लागवड कापसाऐवजी इतर पिकावर शेतकऱ्यांच्या वाढलेला कल वृक्ष लागवड शेतीतील अर्थकारण फळे दूध भाजीपाला याबाबत सजगता आधी विषयाचे ठळक माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)