क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा.. | Maharashtra State Teachers Award

शालेयवृत्त सेवा
0

 



शेवटची तारीख ७ ऑगस्ट !


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

वर्तमान पिढीला मार्गदर्शन करुन भविष्यकालीन पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतात.  शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. 


समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. 


शैक्षणिक वर्ष २०२२ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी नमूद केल्यानुसार वेबलिंकवर आपली आवेदने दिनांक २८ जुलै, २०२२ रोजी ऑगस्ट, २०२२ रोजी पर्यंत सादर करावीत. अशी माहिती शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे महेश पालकर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.


👉

प्रस्ताव दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा 






 


शालेय शिक्षण विभागाच्या या प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे भारत आणि स्काऊटस् गाईडचे सह आयुक्त जितेंद्र महाजन यांनी स्वागत केले आहे. क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल सरांच्या मते पुरस्कार हे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्राप्त झाल्यास इतरांना त्या पासून स्फुर्ती मिळते व त्यातूनच नवसृजनशीलता घडते यासाठी जास्तीत जास्त शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. पुरस्कार मिळो अथवा न मिळो पण खेळाडूवृत्तीने त्यात सहभागी झाले पाहिजे. शाळा मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाने यासाठी आपल्या शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत निधी जैन यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)