पहिल्याच दिवशी मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची पार्डीच्या शाळेला भेट ......!On the first day, Chief Executive Officer Varsha Thakur visited Pardi's school

शालेयवृत्त सेवा
0

 





नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

पार्डी येथील शाळा परिसर सुंदर असून ,विविध उपक्रमांची खाण असलेली शाळा आहे .शाळेतील प्रत्येक शिक्षक व मुख्याध्यापक मेहनतीने विद्यार्थ्यांना घडवीत असल्याचे मत मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केले .


उन्हाळी सुट्यानंतर १५ जून पासून शाळा सुरू झाल्या आहेत .शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या आवारात रांगोळ्या काढून वर्ग खोल्यात पताकांनी सजवून तसेच विद्यार्थ्यांना फुल गुच्छ देऊन त्यांना गोड पदार्थ खाऊ वाटून स्वागत करण्यात आले .जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर , उपमुख्यकार्यकरी अधिकारी प्रकल्प अधिकारी डॉ .विलास ढवळे ,नायब तहसीलदार सुनील माचेवाड , गटविकास अधिकारी अर्धापुरचे कदम सर , यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक पार्डी ( म ) शाळेत भेट दिली.


प्रवेशित मुलांचे वर्षा ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले .मुलांच्या पायाचे ठसे घेऊन शाळेत पहिले पाऊल हा उपक्रम घेतला .शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन च्या प्रत्येक कृती मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांनी शिक्षक - विद्यार्थी यांचे निरीक्षण करून प्रवेशित बालकांचे व पालकांचे स्वागत केले .मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले .या प्रसंगी मुख्याध्यापक राजेश देशमुख , शिक्षक योगाजी कल्याणकर ,रमेश पावडे ,नामदेव भोसले ,शोभा देशमुख , मंगला सलामे , उषा नळगिरे उपस्थित होते .


ग्रामपंचायत कार्यालय परिसरात केले वृक्षरोपण ....!.


ग्रामपंचायत कार्यालया परिसरात वर्षा ठाकूर व सरपंच जिजाबाई कांबळे यांचे हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले .यावेळी गाव फार सुंदर असून पुढील काळात चार हजार वृक्ष लागवड करावी अश्या सूचना केल्या तसेच स्मशानभूमीत जाती जास्त वृक्ष लागवड करून स्मशानभूमी सुशोभित करावी असे आदेश दिले .तसेच लघुउद्योगासाठी पुढाकार घ्यावा .ज्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले .यावेळी ग्रामसेवक आर .यु .शिंदे , माजी सरपंच निळकंठराव मदने ,माजी सरपंच मारोतराव देशमुख , ग्रामपंचायत सदस्य हनुमंतराव देशमुख आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)