जिल्हा परिषद मारतळा केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 


               

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मारतळा दिनांक 15 जून 2022 महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष 13 जूनला सुरू झाले असले तरी मुलांसाठी आज सर्व महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यात आले आहेत नियोजनाप्रमाणे शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 


सुरुवातीला गावातील उपसरपंच भास्कर पाटील ढगे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील ढेपे यांच्या हस्ते वर्ग पहिली दाखल होणाऱ्या मुलांचे स्वागत करण्यात आले नंतर विविध टप्प्यात बौद्धिक विकास पाहण्यात आला. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार बंद होता तो आता नियमितपणे सुरू झाला असून यानिमित्ताने गोड भात देण्यात आला शाळेत आलेल्या सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तक देण्यात आले.


मागील दोन वर्षापासून शैक्षणिक नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सेतू अभ्यास लवकरच सुरु करण्यात येणार असून याची प्रभावी अंमलबजावणी करून मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा शाळेत राबवणार असल्याचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी यावेळी सांगितले यावेळी पालक पांडुरंग ढेपे, रामराव ढेपे, उपाध्यक्ष भीमराव लांडगे ,मुख्याध्यापक व्यंकट मुगावे, देवबा होळकर प्रल्हाद पवार,बालाजी प्यारलावार, श्रीमती उज्वला जोशी जयश्री बारोळे, माधुरी मलदोडे आदींची उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)