लोणी शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात !
पहिल्याच दिवशी फुलाने स्वागत आणि पाठयपुस्तके वाटप !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
किनवट तालुक्यातील कमठाला केंद्रातील लोणी शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात झाला. यावेळी पहिल्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेण्यात आले.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निर्देशानुसार आणि मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांच्या आवाहनानुसार लोणी जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. यावेळी पाहिल्या वर्गातील प्रवेशित मुलांच्या पायाचे ठसे घेण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि पाठ्यपुस्तकं वाटप करण्यात आले.
शाळापूर्व तयारी मेळाव्यात सात स्टॉल लावून मुलांचे शारीरिक विकास क्षमता, बौद्धीक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी यावर विद्यार्थांकडून कृती घेण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन लोंढे , मुख्याध्यापक वर्षा कुलकर्णी, माता पालक संघाचे विजेता परचाके, सपना काळे, प्रिया कदम, स्वंयसेवक ज्योती खरे, अंगणवाडी सेविका शोभा गेडाम, प्रस्तूत शाळेचे शिक्षिका शाहिन बेग, विद्या श्रीमेवार, शिक्षक रमेश मुनेश्वर उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .