नांदेड ( कैलास पोहरे ) :
निळा जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा भाग दोनचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास भेट देण्यासाठी बीट निळा च्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय सौ.लता कौठेकर मॅडम,केंद्रप्रमुख आदरणीय श्री धोपटे व्ही.एस.,मुख्याध्यापक श्री चोंडे एन.एम.आणि त्याचा सर्व स्टाफ,तिन्ही अंगणवाडी ताई आणि त्यांच्या मसदतनीस, प्रथम सेवाभावी संस्था च्या काशिफा मॅडम आणि माता पालक वर्ग आणि शालेय व्यवस्थापान समिती निळा चे अध्यक्ष श्री शिवाजीराव भाऊराव जोगदंड,निळा ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. कोमल रोहित हिंगोले,सदस्य गोविंदराव हिंगोले,काशिनाथ हिंगोले,दिनेश थंडवे,नंदू जोगदंड,काशिनाथ हिंगोले अडी मान्यवर उपस्थित होते.सरपंच कोमल रोहित हिंगोले यांच्या हस्ते मेळाव्याचे रिबीन कापून उदघाट्न करण्यात आले.
दैनिक परिपाठ चे निरीक्षण करून कौठेकर मॅडम यांनी त्यात काही सूचना दिल्या, इयत्ता पाहिलेतील नवागतांच्या पावलांचे ठस्से घेण्यात आले, मान्यवरांच्या हस्ते नावागतांना शालेय पुस्तके,आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.लावण्यात आलेल्या सात ही स्टॉल ला भेटी दिल्या.
प्रत्येक वर्गात जाऊन सिडबॉल ची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले,शालेय परिसर स्वच्छतेच्या काही सूचना दिल्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय प्रांगणात आज ही दोन वटवृक्ष्यांचे रोपण करण्यात आले.
इयत्ता पाहिलीतील प्रत्यक्ष प्रवेश झालेल्या मुलांकडून पहिल्या मेळाव्यात करून घेतलेल्याच कृती पुन्हा कारून घेण्यात आल्या.एकंदरीत आजच्या शाळांपूर्व तयारीच्या मेळाव्याने मागील दोन वर्ष्यापासून कोरोना च्या सावटा खाली असलेल्या,धास्तावलेल्या पालक,शिक्षक आणि विध्यार्थी यांना काही प्रमाणात का होईना त्यातून बाहेर पाडण्यास आणि आपला पाल्य याच शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेऊ शकतो असा विश्वास पालकांच्या मनात निर्माण करण्यात शालेय प्रशासन आणि सर्व शिक्षक यशस्वि ठरले...
मेळावा यशस्वी करण्यासाठी चोंडे सर,बेळगे सर,पोहरे सर,पांडे मॅडम, रत्नपारखी मॅडम,गंजेवार मॅडम, मोखण्डपल्ले मॅडम,वाघमारे मॅडम,कर्णेवार मॅडम,आणि आयत्ता पाहिलंच्या आदर्श वर्गशिक्षिका आदरणीय पां पटवार मॅडम यांनी खूप परिश्रम घेतले...कार्यालयाच्या समोर साठी स्टॉल दर्शवणारी आकर्षक रांगोळी हे आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .