नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षणाधिकारी झालेत शैक्षणिक रथाचे सारथी | The charioteer of the educational chariot has become the education officer to welcome the new students!

शालेयवृत्त सेवा
0

 



श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिराचा अनोखा उपक्रम !

नवागत विद्यार्थ्यांचे शाळेत वाजत-गाजत मिरवणूक काढत गुलाबपुष्प देऊन स्वागत !


नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे बंद असलेल्या शाळा आज उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होत आहेत. शासनाच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी सर्वच नवागत विद्यार्थ्यांचे शाळेत वाजत-गाजत मिरवणूक काढत गुलाबपुष्प देऊन  स्वागत होत असताना श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आकर्षक घोडागाडी रथ व शाळेची बस सजवत विद्यार्थ्यांना बसवून ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत प्रवेशद्वारापर्यंत आणून गुलाब पुष्प देत मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व या शैक्षणिक रथाचे सारथी होण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असे मत हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशु विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव समारंभप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. 


पुढे ते म्हणाले शाळेने पहिल्या दिवशी केलेले विद्यार्थ्यांचे स्वागत हे विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असे आहे असेच नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी व आवड उत्साह निर्माण होईल यासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे अशी सदिच्छा व्यक्त केली व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित संस्थेच्या संचालिका सौ.अनिता शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणातून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री रुपेश चौधरी यांनी प्रास्ताविक सादर करत संस्थेच्या तसेच शाळेच्या माध्यमातून कोरोना काळात चालवलेले उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न व पुढील शैक्षणिक वर्षातील धोरण यांचा लेखाजोखा सादर करत शाळेच्या व संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला व  विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. प्रवेशोत्सव समारंभात विद्यार्थ्यांना सजवलेल्या घोडाच्या रथातुन व शाळेच्या बसमध्ये बसवून प्रवेशद्वारापर्यंत वाजत-गाजत  आणण्यात आले तेथे मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत झाले.


शाळेचा पहिला दिवस मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे व शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी केक कापून शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदात साजरा केला व सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड व्हावे म्हणून केक वाटप करण्यात आला. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश काटके व आभार प्रदर्शन श्रीमती नयना सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री युवराज भामरे, श्री विशाल चौधरी, शेखर पाटील, रवी चौधरी, सुधाकर ठाकूर,चेतन वसईकर आदींनी सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)